पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थेच्या समस्यांचे निदान


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

गच्या लेखात आपण संस्थांची संरचना, कार्यपध्दती व व्यावसायिक संबंध यांचा व्यवस्थापकीय मार्गदर्शकाच्या दृष्टीतून विचार केला. या लेखात संस्थेमध्येे उद्भवणाच्या समस्या व त्यांची सोडवणूक करण्यासाठी व्यवस्थापकीय सल्लागार किंवा मार्गदर्शकाला काय करावं लागतं याची माहिती घेणार आहोत. आपल्याला काही आजार झाल्यास आपण डॉक्टरकडे जातो. तो प्रथम आपल्याला काय होतंय याची माहिती घेतो. आवश्यकता असल्यास काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला देतो. त्या आधारावर आजाराचंं निदान करतो. मग औषध योजना करतो. आपण ती औषधंं सांगितलेल्या पध्दतीनं आणि सांगितलेल्या प्रमाणात घेतो की नाही हे ठरवितो.ही प्रक्रिया सुरू असताना आपली नेहमी तपासणी करतो. समजा, एखाद्या औषधानं आजार बरा होत नाही असं दिसून आल्यास ते बदलून देतो. एकंदर या सर्व प्रक्रियांंचा उद्देश आपला आजार बरा व्हावा व प्रकृती पूर्वपदावर यावी हा असतो. संस्थेची संरचना,पध्दती व संबंध यामध्ये निर्माण होणाच्या समस्या सोडविण्याचीही नेमकी हीच पध्दत आहे. तिच्या चार पायऱ्या आहेत.

 १. समस्येचं निदान २. उपाययोजना ३.उपाययोजनेची अंमलबजावणी
 ४. छाननी

समस्येचं निदान : आपल्याला काय होतंय हे रुग्ण डॉक्टरला नेमकं सांगू शकला, तर औषध योजना करणं अतिसुलभ होतं. पण अनेकदा आपली अडचण कोणती आहे हे रुग्ण अचूकपणे सांगू शकत नाही. त्याच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवालही त्यावर प्रकाश टाकू शकत नाहीत. अशा वेळी रुग्णामध्ये दिसून येणारी लक्षणं आणि आपलं ज्ञान, अनुभव व तर्कबुध्दी यांचा उपयोग करून रोगनिदान करावं लागतं. इथंंच डॉक्टरच्या कौशल्याची कसोटी लागते. व्यवस्थापकीय सल्लागाराचंही असंच आहे.‘रुग्ण' संस्थांचे ‘सल्लेच्छुुक ' अधिकारी त्याला संस्थेच्या पध्दतीबद्दल ढोबळ कल्पना देऊ शकतात. पण नेमका आजार कोणता हे सांगू शकत नाहीत. ‘आम्ही ठरलेल्या मुदतीत माल पुरवू शकत नाही’ ‘आमच्याकडे कर्मचाच्यांची संख्या फारच अधिक आहे’ ‘आमच्याकडे वस्तू - मालमत्ता (इन्व्हेंटरी) नको इतकी आहे. अशा स्वरूपात

संस्थेच्या समस्यांचे निदान/२२६