पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


होऊन स्वतंत्र अस्मिता प्राणपणाने जपणारे असंख्य छोटे छोटे समाजगट तयार झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान गट एकत्र येऊन नव्या बृहत समाजाची निमिती करताना पाहावयास मिळत आहेत. युरोपात संयुक्त रशिया, झेकोस्लोव्हाकिया इत्यादी देशांचे तुकडे होऊन नवी राष्ट्रंं जन्माला आली आहेत, तर बर्लिनची भिंत कोलमडून दोन्ही जर्मनी एकत्र झाले आहेत. तरीही संपूर्ण युरोप खंड जगासमोर स्वतःची ‘एक देश’ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 अनेक देशांची आर्थिक धोरणं आजही साचेबंद आहेत. आपला आर्थिक फायदा टिकून राहावा यासाठी अन्य देशातील नागरिकांना अशा देशात प्रवेश दिला जात नाही. दिला तरी त्यांच्यावर अनेक जाचक अटी व बंधनं घातली जातात. तर काही देश आर्थिक फायद्यासाठीच एकत्र येऊन काम करतात असं दिसून येतं. असं परस्परविरोधी चित्र दिसत असलं, तरी नजीकच्या भविष्यकाळाचा विचार करता, मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या समाजांची प्रगती संरक्षित अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या समाजांपेक्षा अधिक होणार असं चित्र दिसत आहे. तरीही सर्व समाज कधी एकाच विचारांचा बनू शकत नाही. त्याच्यावर भिन्न भिन्न वैचारिक शक्तींचा प्रभाव राहीलच. त्यामुळेच ज्याला सीमाविरहित बनण्याची चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गॅट' कराराला जवळ जवळ प्रत्येक देशातल्या विवक्षित समाज घटकांकडून विरोध होत आहे. मात्र बहुतेक देशांच्या सरकारांनी तो स्वीकारला आहे!
 कितीही विरोध होत असला तरी गॅट कराराची वाटचाल सुरू आहे आणि पुढच्या पिढीला ‘सीमाविरहित आर्थिक जग’ स्थापन झालेलं पाहावयास मिळेल अशी शक्यता आहे. या स्थितीमुळं सर्व औद्योगिक व सामाजिक संस्थांच्या व्यवस्थापकांवर दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या आहेत. एक राजकीय शक्ती आणि आर्थिक शक्ती यांचा समन्वय घडवून आणणं व दोन प्रत्येक नागरिकाला सीमाविरहित जगाचा फायदा घेण्यास सज्ज बनवणं.यासाठी जगात एक संपर्क भाषा आणि एक आर्थिक संस्कृती निर्माण होणं आवश्यक आहे.स्वत:च्या घरात लोकांनी भाषा व संस्कृती यांचं वैविध्य जपलं तरी बाह्य जगात त्या वैविध्याबाबत हट्टाग्रही असणं प्रगतीला मारक ठरणारे आहे,याची जाणीव करून देणं जरुरीचं आहे.

 सध्या इंग्रजी ही सर्व जगाची संपर्क भाषा बनू पाहत आहे. त्यामुळं आपल्याला इग्रजी यावं अशी जवळपास प्रत्येकाची इच्छा असते व अनेकांनी ती कामचलाऊ प्रमाणात आत्मसात केलेली आहे.तसंच उदारमतवाद व लोकशाही याकडेही अधिकाधिक संख्येनं लोक आकर्षित होताहेत.या दोन बाबींवर आधारित असा समाज निर्माण झाल्यास भौगोलिक सीमांचा विचार न करता सरकारे कार्य करू शकतील.

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/२०७