पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


वरिष्ठानं पदोन्नती दिली की, ती कशी मिळाली असेल हा विषय चवीचवीनं चघळला जातो. त्यात असूया आणि मत्सर अधिक प्रमाणात असतो. कंपनीचे कंत्राटदार, पुरवठादार, जाहिरात संस्था यांच्यामार्फत आपली 'ती' सोय करून घेणं, व्यवस्थापकाच्या दृष्टीनं कमी धोक्याचं असतं. तरीही लैंगिक भ्रष्टाचार हा सर्वाधिक चर्चेचा विषय राहतोच. याचा व्यवस्थापकाच्या नैतिक प्रतिमेवरही सर्वाधिक परिणाम होतो.

 थेट पैशाचा भ्रष्टाचार (उदाहरणार्थ, खरेदी करताना पर्सेंटेज मागणं) केल्याने बऱ्याच वेळा पक्षपात होण्याची शक्यता असते. मोठे पुरवठादार अधिक पैसा चारून आपला माल खरेदी करावयास लावू शकतात. छोटे पुरवठादार इतका पैसा पुरवू शकत नाहीत. त्यामुळं त्यांचा माल खरेदी केला जात नाही, मग ते आरडाओरड करतात. परिणामी 'गुप्तता' धोक्यात येते. हे टाळण्यासाठी हुशार व्यवस्थापक साधारण २० टक्के माल मोठ्या पुरवठादाराकडून 'पर्सेंटेज' घेऊन, तर ८० टक्के माल छोट्या पुरवठादारांकडून प्रामाणिकपणाने खरेदी करतात. (याला ‘पॅॅरेटोचा नियम' असं नामाभिधान आहे.) त्यामुळं पैसा आणि प्रामाणिकतेबद्दल प्रसिध्दी हे दोन्ही उद्देश साध्य होऊ शकतात.

 थेट आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराची चर्चा कमी होते. प्रमोटर्सच्या कोट्यातून शेअर्स मिळविणे, चेक पेमेंट केल्याचं दाखवून स्थावर मालमत्ता मिळवणं, सभा, चर्चासत्र इत्यादींसाठी निमंत्रणं मिळवणं आणि खर्च आयोजक संस्थेवर टाकणं इत्यादी मार्गानी हा भ्रष्टाचार केला जातो.

 खानेखिलानेवाला :

 भ्रष्टाचाराच्या चर्चेची सुरुवात संस्थेपासूनच - विशेषत: कनिष्ठ व सहयोगी कर्मचाऱ्यांपासून होते. यातही नैतिकतेच्या काळजीपेक्षा मत्सराचा भाग अधिकार असतो. हे टाळण्यासाठी व्यवस्थापक आपल्या भ्रष्टाचारात इतरांनाही सामावून घेतात. 'एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा वापर केला जातो. अशा व्यवस्थापकाची प्रतिमा 'खाने - खिलानेवाला' अशी होते. त्यामुळे चर्चेला वाव कमी मिळतो

 भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा शत्रू नैतिकता नसून मत्सर आहे. आवाज उठविणाऱ्यांची तक्रार मुख्यतः भ्रष्टाचाराबद्दल नसून आपल्याला तो करावयाला मिळत नाही किंवा त्यात वाटा मिळत नाही, याबद्दल असते. त्यामुळे भ्रष्टाचारातून मिळणारी प्राप्ती इतरांच्या, निदान जवळच्या लोकांच्या नजरेस पडू नये म्हणन काळजी घेतली जाते. भ्रष्टाचाऱ्यांना यासंबंधी आपल्या बायकोवर अधिक लक्ष द्यावं लागतं. कारण मिरविण्याची हौस बायकांना अधिक असते असं आढळून आले आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गानं मिळविलेली संपत्ती दिसून येऊ नये म्हणून व्यवस्थापक पुढील काळजी घेत

व्यवस्थापकीय भ्रष्टाचार : एक चिंतन/ १९८