पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१९१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वयंव्यवस्थापन (भाग तिसरा)


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

साव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांतील ही गोष्ट आहे. ब्रिटनची राजधानी लंडन येथे जर्मनीचा राजदूत होता. अत्यंत चाणाक्ष व बुद्धिमान मुत्सद्दी म्हणून त्याची जगभरात ख्याती होती. आज ना उद्या तो जर्मनीचा परराष्ट्रामंत्री होईल, कदाचित चान्सेलरसुध्दा होईल अशी त्यावेळी अनेक राजनीतितज्ज्ञांंना खात्री होती. मात्र, १९०६ मध्ये त्याला अचानक राजीनामा द्यावा लागला. कारणही तसंच घडलं होतं. ब्रिटनचा सम्राट एडवर्ड (सातवा) याच्याकरिता जर्मन दूतावासानंं भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या सम्राटाला 'बाई'चा जबरदस्त नाद होता. आपल्याला कोणतं ‘भोजन' हवं ते त्यानं जर्मनीच्या राजदूताला सांगितलं.

 'मी रोज सकाळी उठल्यानंतर आरशात पाहून दाढी करतो, तेव्हा मला माझं प्रतिबिंब दिसतं. वेश्यांच्या दलालाचं नव्हे’ असं तडफदार उत्तर देऊन राजदूतानंं सम्राटाची मागणी नाकारली. सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याच्या सम्राटाचा चेहरा खर्रकन् उतरला. पुढं व्हायचं तेच झालं. राजदूताला त्याच्या तत्वनिष्ठेची शिक्षा भोगावी लागली. राजीनामा द्यावा लागला. त्याचं संभाव्य राजकीय भवितव्य उद्ध्वस्त झालं. हे असंच होणार याची त्यालाही कल्पना होती. तरीही त्यानं तत्त्वांशी तडजोड केली नाही.
 स्वत:चं व्यवस्थापन उत्तम व्हावं अशी इच्छा बाळगणाऱ्या कुणालाही या राजदूताचा आदर्श ठेवावा लागेल. कोणता आदर्श आपण स्वतःसमोर ठेवू इच्छितो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हा प्रश्न केवळ नीतिमत्तेशी संबंधित नाही कारण तिचे नियम सर्वांना सारखेच असतात. हा आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. मनाच्या आरशात पाहताना आपलं कोणत्या प्रकारचे प्रतिबिंब आपल्याला दिसावं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. ही 'मिरर टेस्ट' स्वयंव्यवस्थापनाच्या संदर्भात महत्त्वाची आहे. आपला 'पिंड' कोणता याची जाणीव या चाचणीद्वारे करून घेता येते.

 एखाद्या संस्थेतील नीतिमूल्यं अन्य संस्थेतील नीतिमूल्यांपेक्षा वेगळी किंवा पूर्णपणे विरुध्दही असू शकतात. तसंच एका परिस्थितीत नैतिक वाटणारी बाब दुसऱ्या परिस्थितीत अनैतिक ठरू शकते. कारण नीतिमूल्यांची निश्चित अशी व्याख्या सांगता

स्वयंव्यवस्थापन करताना / १८२