पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती आजची नसून तिला हजारो वर्षांचा इतिहास आहे.
 सुमारे १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करू लागला. त्यामुळे भटकंती संपून त्याच्या जीवनात स्थिरता आली. ही स्थिरता आपल्या पुढच्या पिढ्यांनाही मिळावी या विचारातून मालकी हक्काच्या संकल्पनेची जाणीव निर्माण झाली. आपण कसतो ती जमीन, पाळतो ती गुरेढोरे यांच्यावर आपला अधिकार आहे. या जाणिवेतून 'मालमत्ते'चा जन्म झाला. मालमत्ता जितकी जास्त तितकी स्थिरता अधिक हे सूत्र उमगल्यानंतर अधिकाधिक मालमत्ता संग्रहित करण्याचा प्रयत्नं त्याने सुरू केला.
 या प्रयत्नात जे यशस्वी झाले; त्यांना ‘मालक'किंवा राजा' म्हणून ओळखण्यात येऊ लागले. मालक व त्याचं संपूर्ण कुटुंब मालमत्तेची देखभाल करीत असे. पुढे या मालकांची मालमत्ता इतकी वाढली की, तिची राखण व उपयोग व्यवस्थितपणे करणं एका कुटुंबाला शक्य होईना. त्यामुळे तिचा कारभार पाहण्यासाठी पगार किंवा मोबदला देऊनं कुटुंबाबाहेरील व्यक्तींना नेमण्यात येऊ लागले. त्यांना ‘नोकर’ किंवा ‘दास'असं संबोधण्यात येऊ लागले.
 कालांतराने काही मालक कुटुंबाकडे नोकरांची संख्या इतकी वाढली की, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना अशक्य झाले. त्यावेळी या नोकरांपैकीच काही जणांना वरचा दर्जा देण्यात येऊन अन्य नोकरांकडून काम करून घेण्याचा अधिकार देण्यात आला. याचवेळी 'व्यावसायिक व्यवस्थापन' ही संकल्पना अस्तित्वात आली.
 मालक व नोकर यांच्यामधलं स्थान असणाऱ्या या नव्या कर्मचारी वर्षाला उत्तर भारतात ‘मुन्शी' असं नामाभिधान प्राप्त झाले. महाराष्ट्रात यांनाच ‘कारभारी' अशी संज्ञा होती. नोकरांकडून काम करून घेऊन मालकाचा फायदा करून देण्याची जबाबदारी या वर्गाची असे. यापुढील काळात शेती व पशुपालनाच्या तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. या तंत्रज्ञानाची माहिती मालकांना असेच असे नसे. त्यामुळे कारभारी वर्गावर मालक अधिकाधिक अवलंबून राहू लागले. कारभारी मालक व नोकर यांच्यातील दुवा बनले. नोकरांना मालकांशी संपर्क करायचा असेल, तर या कारभाऱ्यांमार्फत करावा लागे. मालकांनां वेळप्रसंगी सल्ला देण्याचे कामही या कारभाऱ्यांना करावं लागे.
अशा तऱ्हेने जुन्या काळातील शेती व पशुपालन हे उद्योग सांभाळण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची मालक, कारभारी व नोकर अशी तीन स्तरीय पध्दती अस्तित्वात आली. या पध्दतीत या तिघांनाही विवक्षित भूमिका होती.
 कालांतराने या पध्दतीत अनेक अपप्रवृत्ती शिरल्या. नोकरांचे शोषण करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याकडे मालकांचं लक्ष राहू लागलं. मालक स्वत:ला परमेश्वराचा अवतार व नोकरांना तुच्छ समजू लागले. प्रचंड संपत्ती व सत्ता हाती आल्याने अनेक

मालक भोगविलासात मग्न राहू लागले. मदिरा, मदिराक्षी, जुगार आदी व्यसनांकरीता

मालकाबद्दल वाटणारी भीती/१०