पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अडीचशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने काही दशकात या हजारो वर्ष चालत आलेल्या परंपरेची कंबर मोडली. कारखानदारीमुळंं शेती व्यवसायाचंं महत्त्व कमी झालं. नवं तंत्रज्ञान विकसित झालं. त्यामुळे नवे व्यवसाय उदयास आले. त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान कुटुंबाच्या बाहेरून आणणंं भाग पडू लागलं. पिढीजात सवयी बदलणंं आवश्यक झालं. औद्योगिक क्रांतीबरोबरच आधुनिक शिक्षणाचा प्रसार झाला. आपल्या आवडीप्रमाणंं घ्यावं आणि त्याला अनुरूप व्यवसाय चालू करावा, अशी नवी समाजरचना निर्माण झाली. एकंदर, औद्योगिक व व्यवसायात्मक घडामोडींचा वेग कमालीचा वाढला. नित्य नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन उत्पादनंं तयार करून बाजारात आणण्याचा सपाटा उद्योगांनी सुरू केला. त्यामुळंं अनुभवांपेक्षा नावीन्याला, ताजेपणाला अधिक किंमत प्राप्त झाली.
 परिणामी, ‘जुनं ते सोनं' ही म्हण कालबाह्य ठरली. विकसित जगात सुरू झालेले है परिवर्तन कालांतराने विकसनशील जगातही पसरलं. वृद्ध असणंं किंवा दिसणंं कमीपणाचे मानलंं जाऊ लागलं. एकत्र कुटुंब पध्दतींंचा नाश झाल्यानंतर तर वृध्दांची अवस्था अधिकच बिकट बनली.
दुसऱ्या करिअरची संकल्पना :
 विज्ञानाने माणसाचं मरण काही वर्षे पुढे ढकललेलं आहे. सुखवस्तू व्यक्तीची पंचाहत्तर वर्षांपूवींची सरासरी आयुर्मर्यादा ६५ वर्षे होती. ती आता ८० च्या घरात गेली आहे. शास्त्रज्ञांनी माणसांचं आयुष्य वाढविण्याकडे लक्ष केंद्रित केलं असलं तरी समाजशास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि समाज यांनी या आणि वाढीव आयुष्याचं काय करायचं याबाबत कोणतेच दिशानिर्देश उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यातच असलेली नोकरी किती वर्षे टिकेल याचीही शाश्वती नसल्याने ५८-६० व्या वर्षापूर्वीच निवृत्ती स्वीकारावी लागली तर उर्वरित आयुष्य कसं ‘घालवायचं’ ही समस्या अनेकांपुढे आ वासून उभी आहे.
 दुसरं करिअर हा यावर उपाय आहे. याची सुरुवात आपल्या पहिल्या करिअरच्या कालावधीतच करावी लागते. व्यवस्थापनशास्त्राचे जगप्रसिध्द गुरु पीटर ड्रकर यांच्या सूचनेनुसार नोकरीतील उच्चपदस्थानं पन्नाशीला आल्यानंतर दुसरं करिअर करण्याच्या दृष्टीनं पायाभरणी करून ठेवण्यास सुरुवात करावयास हवी, म्हणजे निवृत्तीच्या वयापर्यंत तो त्यात पदार्पण करण्यास सज्ज होतो.

 क्रिकेटमध्ये जसं केवळ पहिल्या ‘इनिंग'मध्ये चांगली फलंदाजी करून चालत नाही. दुसरी इनिंगही तितकीच, कित्येकदा त्याहूनही अधिक महत्त्वाची असते. कारण सामना चुरशीचा असेल तर दुसया इनिंगमधील धावसंख्येवर सामन्याचा निकाल

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१३७