पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असते. पांढरा भ्रष्टाचार मात्र अधिक शास्त्रशुध्द व गुप्त पध्दतीने होतो. त्याचा थेट पुरावा मिळणं दुुरापास्तच असतं. पांढरा भ्रष्टाचार काळ्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढविण्यासही कारणीभूत ठरतो. सुरुवातीचे उदाहरण पाहा.यंत्रसामुग्री चालविण्यास सोपी असूनही काही तंत्रज्ञांनी मालकांच्या अज्ञानाचा फायदा उठवूून घसघशीत पगारवाढ पदरात पाडून घेतली, ही बाब मालकांच्या लक्षात आली नसली तरी कंपनीच्या इतर कर्मचार्यांच्या लक्षात येते. मग त्यांचा मत्सर जागृत होतो व तेही जमेल तेथे जमेल तसा काळा वा पांंढरा भ्रष्टाचार करू लागतात.
 संस्थेत चालणाऱ्या चमचेगिरीप्रमाणेच भ्रष्टाचारही पूर्णपणे थांबवता येत नसला तरी त्यावर संस्थाचालक व जबाबदार व्यवस्थापक यांचं पक्के नियंत्रण असणंं आवश्यक आहे.काही कर्मचार्यांचा भ्रष्टाचाराकडे कल असला तरी सर्वच तसे नसतात.जबाबदारीने काम करून संस्थेची उन्नती करणे हे ध्येय बाळगणारे व्यवस्थापक असतातच.संस्थेतील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांना उचलावी लागते. भ्रष्टाचार विरुध्द प्रामाणिकता या युध्दात प्रामाणिकतेचा वरचष्मा जितका जास्त तितकं संस्था भवितव्य उज्ज्वल असते.
 पुढील चार मार्गाचा अवलंब करून भ्रष्टाचाराविरुध्दची लढाई लढली जाते.
 १.मानसिकतेत बदल घडविण्याचा प्रयत्न करणं.
 २.संस्थेतील सत्तास्थानं कमी करून निर्णय प्रक्रिया सुलभ व वेगवान बनविणं.
 ३.संस्थेच्या व्यवहारात पारदर्शकता आणणं.
 ४.भ्रष्टाचार्यांविरुद्ध न बिचकता कायदेशीर कारवाई करणंं.
 हे चारही मार्ग एकमेकांशी संलग्न असून त्यांचा वापर एकाच वेळी करावा लागतो.
 मानसिकतेत बदल :माणसाचं मन हेच भ्रष्टाचाराचंं स्थान आहे.वेगवेगळ्या क्लुप्त्या तिथेच निर्माण होतात.त्यांना बाह्य परिस्थितीचं खतपाणी मिळून भ्रष्टाचारी प्रवृत्ती निर्माण होते. भ्रष्टाचारामुळे संस्थेचं अपरिमित नुकसान होईल. संस्थेचे अस्तित्वही संपुष्टात येईल.आपल्या साऱ्यांच भवितव्य संस्थेवर अवलंबून आहे.संस्था टिकला तर आपण टिकू,ही भावना कर्मचाच्यांच्या मनात निर्माण झाल्यास भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. मात्र हा उपाय दीर्घकालीन आहे व अनुभव असं सांगतो कि, तो फारसा परिणामकारक ठरत नाही. कारण माणसाला भ्रष्टाचार करण्यास उद्युक्त करणार्या शक्तींची ताकद नैतिकतेच्या ताकदीपेक्षा जास्त असते.

 सत्तास्थाने कमी करणे : जितकी सत्तास्थानं जास्त, तितका भ्रष्टाचारही जास्त.'पॉवर करप्ट्स अँँण्ड अँबसोल्यूट पॉवर करप्ट्स अँबसोल्यूटली’अशी एक म्हण आहे.म्हणजे अनिर्बंध सत्ता माणसाला भ्रष्टाचारी बनवते. त्यामुळे संस्थेमध्ये कुणालाही

स्रष्टाचार व त्याचे नियंत्रण/ १०६