पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्या युगाचे महाराज


टिश राजवट येण्यापूर्वी भारत अनेक संस्थानांमध्ये विभागला गेला होता. आपापल्या मगदुराप्रमाणे हे संस्थानिक राज्यकारभार पाहत असत. ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर या संस्थनिकांच्या नव्या पिढीने संस्थानांचा राज्यकारभार ब्रिटिशांवर सोपविला, पण प्रजेकडून कर वसूल करण्याचा अधिकार मात्र स्वतःकडे राखला. पूर्वी राज्यविस्ताराच्या महत्त्वाकांक्षेपोटी संस्थानिकांमध्ये युध्दे होत. मिळणाऱ्या महसुलापैकी बराच पैसा युध्दापोटी खर्च होई.

 आता सर्वच संस्थानांचा कारभार ब्रिटिशांकडे आल्याने ही युध्दे थांबली, पण उत्पन्न सुरूच राहिले. परिणामी त्यांच्यापाशी सोनं, दागिने, जडजवाहीर, जमीनजुमला, भव्य राजवाडे या रूपानं प्रचंड मालमत्ता गोळा झाली.

 या नव्या पिढीतील ‘महाराजां'पैकी फार थोड्यांनी या मालमत्तेचे रूपांतर ‘उत्पादक संपत्ती’ मध्ये केलं. म्हणजेच, या संपत्तीतून उद्योगधंदे निर्माण केले. लोकांसाठी रोजगार व स्वतःसाठी फायदा अशी दुहेरी सोय केली. थोडक्यात, संपत्तीतून संपत्ती निर्माण होईल, अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र, बहुतेकांनी या कष्टाविना मिळालेल्या संपत्तीचा उपयोग मदिरा, मदिराक्षी व गाणे बजावणे अशा भोगविलासांसाठी करून

तिचा चुराडा करून टाकला. याच ब्रिटिशांच्या कालखंडात भारतात अनेक औद्योगिक घराण्यांचा जन्म झाला. टाटा, बिर्ला ही त्यापैकी सर्वतोपरी झालेली नावे होत. अशा घराण्यांच्या पहिल्या पिढीने स्वतःच्या अक्कलहुशारीने व कठोर परिश्रमांतून भव्य उद्योगविश्व साकांरले. इतके दिवस समृध्द आध्यात्मिक संस्कृतीचे माहेरघर म्हणून व कृषिप्रधान म्हणून

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१