पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गल्लीत, रस्त्यात एकमेकांची गाठ पडे. बाचाबाची होऊन प्रत्यक्ष मारामारीच जुंपे. असे दररोज होऊ लागले. पाटीलबुवा आंबरे या विद्यार्थ्यावर संघाच्या स्वयंसेवकांनी हल्ला करून त्याला मारहाण केली. पगारे नावाचे कार्यकर्ते भास्करराव दुर्व्यासमवेत काम करीत. एका पहाटे त्यांच्यावरही हल्ला झाला. त्यांचे हातपाय मोडेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. संघाच्या स्वयंसेवकांचा आमच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर खूप दात असे. हायस्कूल सुटून मुले बाहेर पडताच मारामाच्या सुरू होत. पुढे आम्ही वसतिगृहातील विद्यार्थी नेहमी एकत्र राहू लागलो. सावध असायचो. त्यामुळे आमच्यावर हल्ला करण्याची कोणाची हिंमत होत नसे. " ( अमृतमंथन, पृष्ठ ७२) इंग्रजांसारखा परका शत्रू समोर उभा असताना व त्याच्या विरोधातला स्वातंत्र्यलढा चालू असतानातरी वेगवेगळ्या भारतीय युवागटांमध्ये एकजूट असायला हवी होती; 'समानशीले व्यसनेषु सख्यम्' या न्यायानेतरी त्यांनी एकत्र यायला हवे होते. मुख्यतः भारतीयांमधल्या दुहीमुळेच ब्रिटिश सत्ता भारतात पाय रोवू शकली या ऐतिहासिक सत्याची सेवादलाला वा संघाला जाणीव नव्हती असेही नाही. दोन्ही संघटना देशहितासाठीच स्थापन झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवरही दोन्ही संघटनांमध्ये केवळ त्या वेगवेगळ्या पक्षांच्या आहेत म्हणून वैर असावे आणि दैनंदिन व्यवहारातही ते प्रतिबिंबित होत राहावे याचे वाईट वाटते. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाल्यानंतरही आज या परिस्थितीत फारसा फरक पडला आहे असे वाटत नाही; महात्मा फुलेंच्या स्वप्नातला 'एकमय' समाज आजही आपण निर्माण करू शकलेलो नाही. संगमनेरमध्ये रावसाहेबांचे शिक्षण चालू असताना वडील बंधू अण्णासाहेब नाशिकरोड तुरुंगातच होते. त्यांना भेटायला अधूनमधून राव जात; जाताना त्यांना वाचायला हवी असलेली पुस्तकेही घेऊन जात. दोघांमधला पत्रव्यवहारही चालू होता. या पत्रव्यवहाराच्या संदर्भात घडलेली एक घटना खूप रोचक आहे. जेलमधून येणाऱ्या अण्णाभाऊंच्या पत्रांवर OHMS (म्हणजे On His Majesty's Service) असे लिहिलेले पोस्टाचे स्टँप चिकटवलेले असत. त्या स्टॅपवरती पोस्टाचा शिक्का मारलेला असायचा - म्हणजे त्या स्टॅपचा वापर पूर्ण झाल्यामुळे पोस्टाने ते रद्द (कॅन्सल) केलेले असत. एकदा एका लिफाफ्यावरचा तसला स्टँप MaratT म्हणजे त्यावर पोस्टाचा शिक्का मारायचे राहून गेले होते. रावसाहेबांनी तो स्टँप काढून घेतला व स्वतः लिहिलेल्या पत्रोत्तराच्या पाकिटावर तोच चिकटवला. हा स्टॅप वापरायचा अधिकार सरकारलाच का असावा असा शिंदे बोर्डिंग... -