पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषय इंग्रजी माध्यमात शिकायची वेळ यायची, तेव्हा या मराठी माध्यमातील मुलांना हे विषय अतिशय जड जायचे; त्यांचा पायाच कच्चा राहू लागला. असंख्य विद्यार्थ्यांचे त्यामुळे खूप नुकसान व्हायला लागले. आज ज्यांचे वय पन्नास- साठच्या आसपास आहे अशा साधारण १९५५ ते १९८५ या कालावधीत शालेय शिक्षण घेतलेल्या - एक-दोन पिढ्यांना हा त्रास भोगावा लागला. पुढे मग अनेक मराठी माध्यमाच्या शाळांनीही हे शास्त्रविषय इंग्रजीत शिकवायला सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिकलेल्या रावसाहेबांच्या पिढीला हा शासनाच्या धरसोड धोरणातून झालेला त्रास भोगावा लागला नाही. त्यांचे इंग्रजी त्यांच्यानंतर मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांच्या तुलनेत अधिक चांगले राहिले आणि त्याचा त्यांना पुढील व्यावसायिक शिक्षणातही फायदा झाला. संगमनेरमधील शाळेत प्रवेश घेतल्यानंतर रावसाहेबांच्या शैक्षणिक जीवनात एक फरक पडला. आधीच्या पाडळी, देवठाण, सिन्नर व नाशिकमधल्या शाळांमध्ये, म्हणजे इंग्रजी चौथीपर्यंत, रावसाहेबांचा पहिला नंबर सहसा कधी चुकला नव्हता. मिडलस्कूल आणि हायस्कूल स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्येही त्यांचे यश स्पृहणीय होते; संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. पण संगमनेरमध्ये आल्यानंतर ते परीक्षा चांगल्याप्रकारे उत्तीर्ण होत राहिले तरी त्यांचा नंबर मात्र खाली जाऊ लागला. याचे मुख्य कारण अर्थातच त्यांचा चळवळीतला वाढता सहभाग हेच होते. समाजसेवेला ते व्यक्तिगत शालेय यशापेक्षा अधिक महत्त्व देऊ लागले होते. रावसाहेबांनी या शाळेत प्रवेश घेतला त्या वेळेपावेतो भाऊसाहेब थोरात व धर्मा पोखरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती. ते दोघे वयाने मोठे असूनही त्यांच्या शिक्षणात चळवळीमुळे खंड पडला होता व त्यामुळे हे तिघेही मित्र आता पाचवीच्या त्या वर्गात एकत्र आले. आज संगमनेरला जिथे एस. टी. स्टँड आहे तिथे त्यावेळी राष्ट्रसेवादलाची शाखा सकाळ-संध्याकाळ भरत असे व ते तिघेही त्या शाखेत नियमितपणे एकत्र जात असत. सेवादलाची महिला शाखाही भरायची. के. बी. दादांच्या कन्या प्रभावतीताई या महिला शाखेच्या प्रमुख होत्या. परदेशी तालमीच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखासुद्धा रोज सकाळ-संध्याकाळ भरत असे. सेवादलातली मुले आणि संघातली मुले यांच्यात खूप चुरस असे, नेहमी मारामाच्याही होत. भाऊसाहेब थोरात लिहितात : "पहाटे उठून तरुण मुले ज्याच्या त्याच्या शाखेत निघाली की कोठेतरी अजुनी चालतोची वाट... ९०