पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाली नाही. रावसाहेब म्हणतात, "खरे तर आमची बाई, चुलत्या जिजी व ताई, तसेच मोठ्या वहिनी या सर्व स्वातंत्र्यसैनिकच ठरायला पाहिजे. तथापि याबाबत चळवळीतल्या महत्त्वाच्या नेत्यांना सगळे काही ज्ञात असूनही त्यासंबंधी कोणी दखल घेतली नाही. आम्ही बंधूंनीदेखील यात लक्ष घालावयास पाहिजे होते; पण आम्ही ते घातले नाही. आमच्या हातून ती एक मोठीच घोडचूक झाली. "

स्वातंत्र्यसैनिक म्हणून या महिलांची नोंद झाली नाही म्हणून रावसाहेब खंत व्यक्त करतात आणि ती रास्तच आहे; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः रावसाहेबांचीही स्वातंत्र्यसैनिक म्हणून झालेली नोंद खूप उशिराची, म्हणजे १९९२ सालची, आहे! अलीकडेच तो किस्सा त्यांच्याकडून ऐकायला मिळाला. खरे तर स्वातंत्र्यानंतर लगेचच केंद्र सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यायची योजना जाहीर केली. त्यासाठी लोकांनी अर्ज करणे अपेक्षित होते. एकप्रकारे स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाचा तो सन्मानच होता; ज्यांनी काहीच त्याग केला नव्हता अशाही काही महाभागांनी हे पेन्शन मिळवले तो भाग वेगळा. अण्णासाहेबांनी व रावसाहेबांनी मात्र त्यासाठी अर्जच केला नाही. आपल्या त्यागाचा काही मोबदला मिळवावा हे त्यांना गैरच वाटले. चाळीसएक वर्षे उलटली. केंद्र सरकारची ती योजनाही बंद झाली. त्यानंतर एका कार्यक्रमात रावसाहेब 'अधिकृत' स्वातंत्र्यसैनिक नसल्याचा उल्लेख झाला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार त्या कार्यक्रमात उपस्थित होते. 'असे का' याविषयी त्यांनी चौकशी केली. तेव्हा रावसाहेबांनी त्यासाठी अर्जच केला नव्हता असे उघड झाले. "का नव्हता केला अर्ज ?" अशी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. "कारण ते रावसाहेब आहेत म्हणून!" असे उत्तर शिंदे कुटुंबीयांचे घनिष्ठ मित्र दादासाहेब रुपवते यांनी दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही केली. तिथे उपस्थित असलेल्या शंकरराव कोल्हे या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना त्यांनी "कले ार्फत हे प्रकरण माझ्याकडे पाठवून " द्या" असे लगेच सांगितले. त्यानुसार घडले व मग महाराष्ट्र शासनातर्फे रावसाहेबांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून अधिकृत मान्यता मिळाली. १९९२ साली ! सध्या त्यामुळे त्यांना दरमहा सुमारे ८,000 रुपये मानधन मिळते! अर्थात ते त्यांच्या सामाजिक कार्यावरच खर्चही होते ! कुठलीही चळवळ म्हटली की ती एकेकट्याने करायची बाब नव्हे; समविचारी मंडळींचा पूर्वनियोजित कामामधला एकत्रित सहभाग हा चळवळ या शब्दातच अनुस्यूत आहे. समविचारींचा असा एक गट त्या परिसरातही निर्माण झाला होता. असे तरुण जेव्हा चळवळीत एकत्र काम करतात, विशेषत: अशा चळवळीत की बेचाळीसच्या आंदोलनात... ८३