पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळेनिळे व्हायचे. तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडेपर्यंत रोज मार पडायचा. निमगावजाळीच्या एका डाक बंगल्यात त्यांना तपासासाठी नेले गेले व तिथे तर त्यांना उलटे टांगून असह्य मारझोड केली गेली. मारझोडीचे हे सत्र पंधरा-वीस दिवस सतत चालले होते. क्रांतिकारकांविषयी सहानुभूती असलेला कुलथे नावाचा एक पोलीस त्या तुकडीत होता. स्वतः पोलीस असूनही त्याला हा छळ बघवेना. एकदा एकान्त साधून त्याने धर्मांना सांगितले, "तू कबुलीजबाब देऊन टाक, नाहीतर हे लोक तुला जिवंत सोडणार नाहीत. पोलिसांना सगळे सांगितल्याबद्दल तुला कोणीही सहकारी दोष देणार नाहीत आणि क्रांतीवरच्या तुझ्या निष्ठेबद्दल कोणी शंकाही घेणार नाहीत." यावर धर्मा म्हणाले, "कबुलीजबाबात मला ज्यांचे नाव-पत्ते सांगावे लागतील त्यांना आगाऊ भेटून तू सावध करणार असशील तरच मी कबुलीजबाब देईन." कुलथे त्याला तयार झाला आणि पुढच्या दोन-चार दिवसांत त्याने त्याप्रमाणे पूर्वसूचना द्यायचे काम केले. त्यानंतरच धर्मांनी कबुलीजबाब दिला; तोवर त्यांचा रोजचा छळ चालूच होता. कबुलीजबाबातही त्यांनी पोलिसांची थोडीफार दिशाभूल केलीच. सततच्या मारझोडीमुळे धर्मांचे शरीर अगदी खिळखिळे झाले होते. तोंडाला कोरड पडलेल्या स्थितीत ओठांवर जीभ फिरवत त्यांनी कसाबसा कबुलीजबाब पुरा केला. कुलथे पोलिसाचा कयास खरा ठरला; यानंतर मारझोड थांबली. पण त्यांचा तुरुंगवास मात्र चालूच राहिला. पुढे कुलथे पोलिसालाही अटक करून तुरुंगात टाकले गेले; त्याच्याविरुद्धही वरिष्ठांकडे तक्रार गेलीच होती. कुलथेला नोकरीतूनही कमी केले गेले. कुलथे पोलीस किंवा सावरगावपाटचे किसन पाटील यांची एका कारणासाठी मुद्दाम नोंद करायला हवी. सरकारी नोकरीत असूनही होता होईतो त्यांनी क्रांतिकारकांना भरीव अशी मदत केली. आंदोलनाविषयी सहानुभूती दाखवणाऱ्या सरकारी नोकरांची संख्या अर्थातच खूप कमी होती, पण म्हणूनच अशा देशभक् सरकारी नोकरांचीही क्रांतीच्या इतिहासात दखल घेतली जाणे आवश्यक आहे. कारण खूप मोठा व्यक्तिगत धोका पत्करूनच त्यांनी चळवळीसाठीचे आपले योगदान दिले होते. स्वातंत्र्यलढा हा इंग्रज सत्तेविरुद्ध होता, पण ज्याप्रमाणे काही सरकारी नोकरांची सहानुभूती क्रांतिकारकांकडे होती त्याचप्रमाणे काही इंग्रजी अधिकारीही प्रसंगी सत्तेच्या विरोधात जात असत व आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसारच निर्णय घेत असत. उदाहरणार्थ, पुढे जेव्हा धर्मा पोखरकरांविरुद्ध खटला सुरू झाला तेव्हा अॅसिल या इंग्रज डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स जज्जने पोलिसांनी उभे केलेले सगळे पुरावे बाजूला सारून 'संशयाचा फायदा' या तत्त्वावर आधारित निकाल दिला व धर्मा अजुनी चालतोची वाट... ८०