पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानेवारी १९४९ रोजी ते फरारी झाले. काबूल- समरकंद-मॉस्कोमार्गे बर्लिनला गेले. दुसरे महायुद्ध त्यावेळी जोरात सुरू होते व ब्रिटिशांविरुद्ध हिटलरची मदत घ्यायची त्यांची योजना होती. पुढे आझाद हिंद सेनेची स्थापना करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा पुकारलादेखील. 'जय हिंद' हे घोषवाक्य त्यांनीच देशाला दिले व 'जनगणमन' हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणूनही त्यांनीच प्रथम स्वीकारले. तिरंगा ध्वज हा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज म्हणून त्यांनीच प्रथम निश्चित केला; त्यामुळे तिरंगा फडकवणे हे देश स्वतंत्र झाल्याचे एक प्रतीक बनले. या सगळ्याचे प्रतिबिंबही बेचाळीसच्या आंदोलनात अपरिहार्यपणे उमटले होते; आंदोलनातले सर्वच सहभागी अहिंसावादी नव्हते व त्यामुळे आंदोलन दडपून टाकण्याच्या सरकारी धोरणाला एकप्रकारचे नैतिक समर्थनही मिळत गेले. एखाद-दुसरा अपवाद वगळता देशातील प्रमुख वृत्तपत्रांनीही सरकार विरोधी ठाम भूमिका घेणे या काळात बव्हंशी टाळले होते हेही इथे नमूद करायला हवे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक-नगर परिसरातील तत्कालीन स्वातंत्र्य आंदोलनाकडे व त्यातील रावसाहेबांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहभागाकडे पाहावे लागेल. त्यांच्या आंदोलनातील सहभागाचा बराचसा सुरुवातीचा भाग तरी शांततामयच होता. राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली होती. पुस्तकांचे वाचन, सभा-बैठका, शिबिरे - चर्चा, प्रभातफेऱ्या याच मार्गाने हा सहभाग होत राहिला. स्वतः अण्णासाहेबांचा भरही अशाच मार्गावर होता. या संदर्भात रावसाहेबांचा सानेगुरुजींशी आलेला संपर्क खूप मोलाचा होता. सानेगुरुजींची पुस्तके तर त्यांच्या मनावर गारूड करून होतीच, पण प्रत्यक्ष भेटीत सानेगुरुजी त्यांच्या मनावर अधिकच ठसले. नाशिकला असताना अनेक गुप्त बैठकींना सानेगुरुजी हजर • सहभागी तरुणांना मार्गदर्शनही करत. . सानेगुरुजींची जनमानसात स्थिरावलेली प्रतिमा ही खूप मवाळ अशा व्यक्तिमत्त्वाची आहे; पण रावसाहेबांना मात्र सानेगुरुजींचे एक वेगळेच दर्शन घडले. ते म्हणतात, "गप्प बसलेले सानेगुरुजी म्हणजे अगदी सोज्वळ गरीब मूर्ती. पण एकदा का गुरुजी बोलायला लागले, की त्यांच्या अंगात जणू वीजच संचारायची, बोलण्याला नुसती धार लागायची. गुरुजींच्या भाषणाने आम्ही सर्व जण पेटून उठायचो." असत, भूमिगत असलेल्या क्रांतिकारकांना आसरा देणे हा चळवळीचाच एक महत्त्वाचा भाग होता. अण्णाभाऊ स्वत: भूमिगतच होते. बडोद्यातील कॉलेजशिक्षण अर्धवट सोडून ते नाशिकला आले होते. तिथून खूपदा ते पाडळी परिसरातच लपून राहत ते बेचाळीसच्या आंदोलनात... ७३