पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या बालपणी आले आहेत. म्हणूनच दारिद्र्य, कष्टप्रद जीवन, सुखसोयींचा अभाव व एकूण मागासलेपण हे सारे वास्तव जमेस धरूनही आपले बालपण खूप आनंदात गेले असे ते म्हणतात. बालपणाचे हे सर्व संस्कार रावसाहेबांचे उर्वरित आयुष्य समृद्ध करून गेले. तसे पाहिले तर इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यानंतर भारतात अनेक प्रकारच्या सुधारणा होऊ लागल्या होत्या. उदाहरणार्थ, २२ फेब्रुवारी १८१४ रोजी देशातील पहिली कापडगिरणी सुरू होऊन उद्योगधंद्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू झाले होते. १५ एप्रिल १८४० रोजी देशातील पहिली बँक 'बँक ऑफ बॉम्बे' सुरू झाली होती जिचे पुढे इंपिरिअल बँकेत व त्यानंतर स्टेट बँकेत रूपांतर झाले. १ नोव्हेंबर १८४५ रोजी मुंबईला आधुनिक वैद्यकशास्त्र शिकवणाऱ्या ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई-ठाणे पहिली आगगाडी धावू लागली होती. १८ जुलै १८५७ रोजी मुंबई विद्यापीठ स्थापन होऊन उच्च शिक्षणाचीही सोय झाली होती. रावसाहेबांचा जन्म झाला तेव्हा या सर्वांनंतर साधारण तीन-चार पिढ्या उलटून गेल्या होत्या. तरीही मुंबईपासून फक्त द किलोमीटर्सपेक्षा कमी अंतरावर असलेल्या त्या गावात, आणि विशेष म्हणजे गावातील सर्वांत प्रतिष्ठित कुटुंबातही, या सुधारणांचे वारे जरासुद्धा पोचले नव्हते. राज्याच्या एका भागातून जवळच्याच दुसन्या भागापर्यंत सुधारणा पोचण्यातला हा प्रचंड विलंब हेच मुळात मागासलेपणाचे एक मोठे लक्षण होते. ग्रामीण आणि शहरी भागातली विषमता ही तशी बहुपरिचित आहे, आजही ती आहेच; पण ते विचारात घेऊनही विकासातली ही तत्कालीन दरी शोचनीय वाटते. त्या पार्श्वभूमीवर अलीकडची एक घटना लक्षणीय आहे. पाडळी गावातील रावसाहेबांच्या घरी जायचा प्रसंग डिसेंबर २०१३मध्ये आला. जिथे त्यांचा जन्म झाला, बालपण गेले तो परिसर एकदातरी नजरेखालून घालावा हा प्रस्तुत लेखकाचा उद्देश. रावसाहेबांच्या आत्मकथनात मी जे पाडळीविषयी वाचले होते, त्याच्यापेक्षा खूपच वेगळे पाडळी मला दिसले. रावसाहेबांच्या सर्वांत मोठ्या बंधुंचे, पाटीलबुवांचे, मोठे पुत्र प्रकाश यांच्या घरी आम्ही गेलो. इतरही काही घरांमध्ये गेलो. घराभोवती चार-पाच तरी आधुनिक मोटारी उभ्या होत्या; मी गेलो त्या गावातल्या सर्व दोन-तीन घरांमध्ये रंगीत टीव्ही होता. "सध्या इथून रोज टोमॅटोचे दोन- तीनशे क्रेटतरी मार्केटला जात आहेत,” कोणीतरी सांगत होते. ही समृद्धी घरातील फर्निचरमध्ये, अंगावरच्या कपड्यांमध्ये नाशिकच्या मोठ्या अवकाशात...