पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करत. इंग्रजीचे प्रायमर व तर्खडकर भाषांतरपाठमाला अभ्यासाला असे. दुसऱ्या दिवशी काय शिकवणार हेही ते तास संपवताना सांगत. तो भाग वाचून, पूर्वतयारी करून मगच शाळेत जायची त्यामुळे रावसाहेबांना सवय झाली व वर्गात शिकवलेले अधिकच चांगले समजायला लागले. तसा इंग्रजी हा एव्हाना त्यांचा आवडता विषय बनलाच होता. वर्गात उत्तरे देण्यासाठी त्यांचा हात कायम वर असे. लौकरच ते ताडेमास्तरांचे आवडते विद्यार्थी बनले. चांगले वर्गशिक्षक व चांगले मुख्याध्यापक लाभणे हे फारच उपयुक्त होते. विशेषत: ग्रामीण भागातून मोठ्या शहरात प्रथमच शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. रावसाहेबांची नाशिकमधल्या शिक्षणाची सुरुवात त्यामुळे उत्तम झाली. मुलाची राहण्याची सोय दादांनी किसन पाटील तांबे या आपल्या व्याह्यांच्या घरी केली होती. दादांची मुलगी जयाबाई हिचे लग्न किसन पाटलांचा मोठा मुलगा विश्वनाथ ह्याच्याबरोबर १९३८ साली झाले होते. विश्वनाथ आणि जयाबाई गोंद्याला राहून घरची शेती सांभाळत. पत्नी कोंडाबाई, धाकटा मुलगा दशरथ व तीन मुली यांच्यासह किसन पाटील नाशिकच्या मखमलाबाद नाक्याजवळ राहत. रावसाहेब त्यांना किसनमामा म्हणत. सागवानी लाकूड, जळाऊ लाकूड, गवत व कोळसा विकायचा त्यांचा धंदा होता. ते सर्व सामान ठेवण्यासाठी त्यांची वखार होती. वखार म्हणजे साडेतीन एकरांची खुली जागा होती. गोदावरी नदी जवळूनच वाहायची. हरसूल - सुरगाणा भागात वनखात्याच्या ( फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची सागाची मोठी जंगले होती. जंगलातील झाडांचे सरकारतर्फे लिलाव होत. ज्याची बोली मोठी त्याला ती झाडे तोडायचा अधिकार असे. प्रचंड उंच वाढलेली जाडजूड झाडे तोडली जात, किसनमामा ट्रक भरभरून ती नाशिकच्या वखारीत आणत. विक्रीसाठी लाकडाचे कापीव व अनगड असे दोन भाग असत. अनगड म्हणजे सागाचे न कापलेले भलेमोठे लाकूड आणि कापीव म्हणजे गाइकाच्या विशिष्ट मागणीनुसार कापून विकले जाणारे लाकूड. लाकडाची किंमत घनफूटानुसार ठरायची. त्याकाळी कॅलक्युलेटर्स साहजिकच नव्हते व गि-हाइकाच्या मागणीनुसार कापलेल्या लाकडाचे आकारमान घटफुटामध्ये मोजून त्याची किंमत ठरवणे हे तसे किचकट काम होते. नाशिकमधला दिनक्रम खूप कष्टाचा होता पण हळूहळू सरावाने तो अंगवळणी पडला. पहाटे लौकर उठायची रावसाहेबांना लहानपणापासून सवय होतीच. उठल्या उठल्या ते अभ्यासाला बसत. मग मामांच्या म्हशींना चारा घालत व त्यांचे दूध अजुनी चालतोची वाट... ४६