पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृतिशीलतेला किती उत्तम वाव मिळतो हे यावरून दिसते. ज्या वाढत्या परावे तसे उगवते असे म्हणतात. रावसाहेबांनी आयुष्यभर समाजात चांगुलपणा पेरला आणि आज तोच चांगुलपणा समाजाकडून त्यांच्या वाट्याला येत आहे. याचे एक उदाहरण म्हणून वैद्यकीय गरजांचा उल्लेख करता येईल वयानुसार वाढतच जातात. श्रीरामपूरचे डॉ. प्रदीप राजे हे आपली सर्व सेवा रावसाहेबांना व शशिकलाताईंना गेली कैक वर्षे विनामूल्य देत आले आहेत. तेथील डोळ्यांचे डॉक्टर संजय शेळके व दातांच्या डॉक्टर अर्चना शेळके किंवा पुण्यातील डोळ्यांचे डॉक्टर राजीव राऊत व होमिओपॅथीचे डॉ. उदय कुलकर्णी हेही आपली सेवा विनामूल्य देत असतात. रावसाहेबांना आज समाजाकडून मिळत असलेल्या अपार कृतज्ञतेचे केवळ एक प्रतीक म्हणून या वैद्यकसेवेचा उल्लेख केला. मुला-नातवंडांपासून केवळ तोंडओळख असलेल्या दूरस्थांपर्यंत अनेकांचे प्रेम आज रावसाहेबांच्या व शशिकलाताईंच्या वाट्याला येत आहे. जे पेरले ते शतगुणित होऊन उगवत आहे. यांचे प्रेम हा आज रावसाहेबांचा सर्वांत मोठा ठेवा (अॅसेट) मानता येईल. - } भाऊसाहेब थोरात यांचा १२ जानेवारी हा जन्मदिन तिथे 'प्रेरणादिन' म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी भाऊसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांचे मार्गदर्शक असलेल्या अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन व्यक्तींना प्रतिष्ठाप्राप्त असा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या, म्हणजे २०१४ सालच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची व प्रस्तुत लेखकाची निवड झाली होती. त्या देखण्या पुरस्कार प्रदान समारंभातील रावसाहेबांचे छोटेसे भाषण त्यांच्या आयुष्यभरातील वाटचालीचे सार मांडणारे होते; आर्थिक समृद्धीच्या जोडीने सांस्कृतिक समृद्धी आणण्याची आवश्यकता अधोरेखित करणारे आणि संस्कृती व नीतिमत्ता याची सांगड घालणारे होते. ते म्हणाले, "इथल्या साखर कारखान्यात यंदा इतकी साखर तयार झाली आणि इतके इतके कोटी रुपये नफा झाला, इथल्या दूधसंघाला इतके इतके कोटी रुपये नफा झाला वगैरे आकडेवारी आज सकाळी इथे आल्यानंतर मला सांगण्यात आली आणि ती सगळी खरी असणार याविषयी माझ्या मनात काहीच शंका नाही. हा परिसर एकेकाळी किती भकास होता आणि आज तो किती गजबजलेला आहे यातले परिवर्तन मी स्वतः पाहत आलो आहे. पण भौतिक उन्नतीला सांस्कृतिक उन्नतीची साथ मिळाली नाही, तर त्याची परिणती चंगळवादात होऊन समाजाची वाटचाल अधोगतीच्या दिशेने होत जाते. याचीच पुढची पायरी व्यसनाधीनता ही आहे. यातूनच मग अहंकार, उद्धटपणा, अजुनी चालतोची वाट... ४३७