पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाकडे करू शकत नाही' हा बेफिकीरपणा, वेगवेगळ्या वेतन आयोगांमुळे सतत वाढत गेलेले पगार, कर्तव्याकडे जराही लक्ष न देता सतत हक्काची भाषा करीत राहणे या सगळ्या प्रवृत्तींमुळे आपल्या समाजातली कार्यसंस्कृती खूप खालावली आहे व हे आपल्या एकूण अवनतीचे एक प्रमुख कारण आहे, अशी रावसाहेबांची धारणा आहे व इतरांना आवडेल वा न आवडेल याची तमा न बाळगता रयतच्या अनेक कार्यक्रमांत ते ती धारणा स्पष्टपणे व्यक्त करत असतात. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारचा नैतिक धाक असल्याने बहुतांशी शिक्षक असणारा श्रोतृवृंद त्यांचे असले विचार ऐकूनही घेत असतो. 'आम आदमी वादा' च्या आजच्या युगात, सतत लोकानुनय करत राहायच्या आजच्या जमान्यात हा स्पष्टवक्तेपणा खूप दुर्मिळ आहे. आपण केवळ दलित आहोत म्हणून वा एखाद्या मागासलेल्या जातीचे आहोत म्हणून आपल्याला नोकरी मिळायला हवी, हा आग्रह रावसाहेबांना पटत नाही. खरेतर आजच्या लोकानुनयाच्या काळात अशी गुणवत्ताकेंद्रित भूमिका घेणे हे मोठे धाडसच आहे; पण रावसाहेब निर्भीडपणे ती भूमिका घेतात. एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे, "आपण दलित आहोत, पीडित आहोत असे कर्मवीर म्हणत नव्हते. 'आपल्याला मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर जिंकायचा आहे, ते ध्येय आपल्याला गाठायचे आहे' असे अण्णा आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असत. त्यामागेही फार मोठा अर्थ होता. सामाजिक न्याय झगडून मिळवला पाहिजे; केवळ दलित, गरीब म्हणून नव्हे तर गुणवत्तेवर मिळवला पाहिजे, असे त्यांना वाटे." (शिक्षण आणि समाज, पृष्ठ ६२ ) नैतिकतेची जाण मध्ये लहानपणापासून खूप सजग आहे. "It is nice to be important but it is more important to be nice" (महत्त्वाचे असणे चांगलेच आहे पण चांगले असणे अधिक महत्त्वाचे) यावर त्यांची श्रद्धा आहे. जीवनात जे जे उदात्त आहे, मंगल आहे त्याची त्यांना आस आहे. ती आस भाबडेपणापासून निर्माण झालेली नाही एक निष्णात यशस्वी वकील तशा अर्थाने भाबडा असतच नाही. ती आस एकूण सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचाच आविष्कार आहे. कारण नैतिकता हा त्यांनी सुसंस्कृतपणाचा गाभाच मानलेला आहे. "Be the change you want to see in the world,” (जगात ज्या प्रकारचा बदल पाहावयाचा आहे तो स्वतःत बाणवा) असे गांधीजी म्हणत. नव्या जगाची सुरुवात स्वत:पासूनच होते. रावसाहेबांपुढे एका आदर्श, सुसंस्कृत जगाचे स्वप्न अजुनी चालतोची वाट... ४३१ -