पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि दर महिन्याच्या एक तारखेला पगार घ्यायचा आहे. ती नोकरीही त्याला सरकारी नोकरी हवी आहे, कायमस्वरूपी हवी आहे. त्याला ठाऊक आहे, की वेगवेगळ्या वेतन आयोगांमुळे त्याचा पगार वाढतच जाणार आहे आणि सरकारनेच केलेले कायदे असे आहेत, की त्याला त्या नोकरीतून कोणी काढूही शकणार नाही. त्यातूनच एक सुखासीन आयुष्य जगायची त्याला चटक लागली आहे. समाजासाठी आपण काही करायला हवं हा विचारसुद्धा त्याच्या मनाला कधी शिवत नाही. आपलं काम इमानेइतबारे करावं असंही त्याला वाटत नाही. कारण त्याला कोणाचाच धाक राहिलेला नाही. " याच पगारदार संस्कृतीमुळे शिक्षणक्षेत्राचा कसा हास झाला आहे याविषयी विवेचन करताना आपल्या एका पुस्तकात रावसाहेब लिहितात : "रवींद्रनाथ टागोरांचे त्यांच्या नात्यातल्या एका लहान मुलीला लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. 'सविस्तर लिहायला हवे पण आता वेळ नाही, कारण वर्गात पाठ घेण्यासाठी जायचे आहे व त्यासाठी मला तयारी करावयाची आहे' असा त्या पत्रात मजकूर आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोरदेखील शाळेतील वर्गावर जाताना पाठाची तयारी करून जातात. या आदर्शाला अनुसरून आमच्या शिक्षक-प्राध्यापकांची प्रेरणाशक्ती जागृत होणार का ? प्राध्यापकांच्या कामाच्या तासांची मोजदाद करताना एक तास वर्गात घ्यावयाचा असल्यास दोन तास तयारी करण्यासाठी लागतात, असे सूत्र गृहीत धरून त्यांच्या कामाच्या तासिकांची संख्या ठरविली आहे. वास्तवात तासाच्या पूर्वतयारीसाठी प्राध्यापक किती वेळ मनोभावे देतात याचे उत्तर प्राध्यापकांवरच सोपविलेले बरे! आपल्या चारित्र्याचे व नीतिमत्तेचे धडे विद्यार्थी पाठ्यपुस्तकातून नव्हे तर आपल्या शिक्षकांच्या वागण्याबोलण्यातून घेत असतात, याचे भान शिक्षक- ध्यापकांना असले पाहिजे. शिक्षकांचा हक्क आणि मागण्यांचा विचार करताना 'First deserve and then desire' हे तत्त्व शिक्षकांना व प्राध्यापकांना मान्य व्हावे. शिक्षक- प्राध्यापकांतच प्रथम चारित्र्याची जोपासना व्हायला पाहिजे, तरच ती विद्यार्थ्यांत होणार. 'यंग इंडिया' या पत्रात १९४२ साली गांधीजींनी सात सामाजिक पा म्हणून एक यादी दिली आहे. 'चारित्र्यहीन शिक्षण हे एक सामाजिक पाप आहे,' असे त्यात नमूद केले आहे." (शिक्षण आणि समाज, २२-३) कायद्याने दिलेली नोकरीची शाश्वती, त्यातून आलेला 'माझे कोणीच काही अजुनी चालतोची वाट... ४३०