पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिलला भेट दिली. त्यावेळी तिथे मॅनेजिंग डिरेक्टर बनलेल्या वदूद खानांशी त्यांची गाठ पडली. दोन भावांमधल्या दिसण्यातील आश्चर्यकारक साधर्म्यामुळे वदूद खानांनी रावसाहेबांची आठवण काढली व अण्णासाहेब - रावसाहेब हे सख्खे भाऊ असल्याचे त्यांना कळले. यातला बराचसा भाग कथानकाच्या ओघात या पुस्तकात आलेलाच आहे. प्रत्यक्ष पुनर्भेटीचा योगही लगेचच आला. सुशीला मडिमन पारंपरिक कारवारी तर वदूद पतियाळाकडचे पठाण, पण एकत्र काम करता करता दोघांची मने जुळली, लग्नही झाले. चळवळीतून बाहेर पडल्यावर दोघांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पक्षातील एकेकाळच्या जिवलग मित्रांचा आता काहीच आधार उरला नव्हता. पोटासाठी वदूदनी मुंबईत टाटा ऑइल मिलमध्ये एक मामुली नोकरी धरली. आत्यंतिक अडचणीच्या वेळी शेवटी कॉर्पोरेट जगानेच आपल्याला हात दिला याबद्दलची कृतज्ञता त्यांनी आयुष्यभर मनात बाळगली. कर्तृत्वाच्या बळावर ते झपाट्याने वर चढत गेले. पुढे टाटा सन्स या टाटा उद्योगसमूहाच्या होल्डिंग कंपनीवरही संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांची ऊर्ध्वगामी वाटचाल अविश्वसनीय वाटावी अशीच होती. 'सक्सेस स्टोरी' म्हणून कॉर्पोरेट जगात त्यांचा बोलबाला होऊ लागला. पुढे पब्लिक सेक्टरमधील पोलाद कारखान्यांच्या व्यवस्थापनासाठी म्हणून इंदिरा गांधींनी त्यांना बोलावून घेतले. आपल्या वडिलांकडून इंदिराजींनी वदूद खानांविषयी पूर्वी ऐकले होते व पोलाद कारखान्यांचे प्रमुख म्हणून ते उत्तम कामगिरी करतील अशी केंद्रीय पोलाद व खाण मंत्री आणि एकेकाळचे साम्यवादी मोहन कुमारमंगलम् यांची शिफारस होती. वदूदना तिथे जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी जेआरडी म्हणाले होते, "सरकारी वातावरणात तुझ्या कार्यक्षमतेला पुरेसा वाव मिळणार नाही. तुझा उत्साह मावळेल आणि एक दिवस तुला तिथून पडावे ." पण इंदिरा गांधींनी स्वत: बोलावल्यानंतर त्यांना नकार देणे वदूदना अप्रशस्त वाटले! शिवाय ज्या पब्लिक सेक्टरची आपण तरुणपणी इतकी भलावण करीत होतो तो प्रत्यक्षात कसा आहे ते एकदा अनुभवावे, हाही विचार त्यांच्या मनात असू शकेल. शेवटी "कधीही परत आलास तरी टाटांचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील,” असे आश्वासन देत नाइलाजाने जेआरडींनी त्यांना निरोप दिला. इंदिरा गांधींच्या आमंत्रणामागची पार्श्वभूमीही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी. १९०८ साली टाटांनी जमशेदपूरला उभारलेला टाटा स्टील हा भारतातील पहिला पोलाद कारखाना स्वातंत्र्यानंतर पोलादाशिवाय भारताचा अजुनी चालतोची वाट... ४१५