पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाटावे अशीच घटना होती. दुसरे म्हणजे, तत्पूर्वीची तीस वर्षे ते रयतचे व्हाइस चेअरमन असले तरी ते काय करू शकतील यावर खूप मर्यादा होत्या. त्यांच्यापूर्वी जवळजवळ अठरा वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे रयतचे चेअरमन होते. आता स्वत:च्या कल्पना राबवायची संधी रावसाहेबांना मिळणार होती व एका अर्थाने ते मोठे आव्हानही होते. - तिसरे एक संभाव्य कारण रावसाहेबांनी स्वतःच एकदा प्रस्तुत लेखकाला सांगितले होते. ते म्हणाले होते, "मी जज्ज बनण्याचे किंवा मंत्री बनण्याचे नाकारले, ही माझे बंधू अण्णाभाऊ यांच्या मते मोठी चूकच होती. ते स्वतः लोकसभेवर १९६२ साली प्रथम निवडून गेले. तेव्हा मंत्रिमंडळात समावेश करण्याऐवजी त्यांना पार्लमेंटरी सेक्रेटरी बनवले होते. अण्णाभाऊ काहीसे दुखावले, नाराज झाले. सेक्रेटरीपद नाकारण्याचा त्यांचा विचार होता. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी त्यांचे मन वळवले. यशवंतरावांना स्वतःलाही पूर्वी वरिष्ठ मंत्री बनण्यापूर्वी असेच खालच्या पदावर राहावे लागले होते, प्रमोशनची प्रतीक्षा करावी लागली होती; पुढे ते मिळालेही. 'दिल्लीत जायची ही मिळालेली संधी सोडू नका, अशी संधी पुन्हा मिळत नाही. एकदा तिथे गेलात, की हळूहळू तुम्ही आणखी वर जाल. पण आत्ता मागे राहिलात, तर पुढे मागेच राहाल, ' हा यशवंतरावांनी दिलेला सल्ला होता. अण्णाभाऊंनी तो मानला आणि मग लौकरच अण्णाभाऊ कृषिमंत्री बनवलेही गेले. त्याचप्रमाणे हायकोर्ट जज्ज वा मंत्री बनल्यावर मीही अधिक वरच्या लेव्हलवर गेलो असतो, माझ्या कामाला अधिक व्यापक स्कोप मिळाला असता असं अण्णाभाऊंचं मत होतं. स्थानिक पातळीवरच राहिल्याने मी छोट्या छोट्या गोष्टींत गुंतून पडलो; काहीतरी अधिक व्यापक काम मी करायला हवं असं अण्णाभाऊचं मत होतं. वेळी त्यांचं मत मला पटलं नव्हतं. पण त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर अण्णाभाऊंच्या मतात खूप तथ्य होतं हे मला जाणवलं. " " • रयतचे चेअरमन बनल्यावर आपण समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकू, पूर्वी करता आल्या नाहीत अशा काही गोष्टी आता आपण अधिकाराचा वापर करून करू शकू असे रावसाहेबांना वाटले असावे. अर्थात मानवी मन इतके गुंतागुंतीचे आहे, की आपल्या अंतर्मनात होणाऱ्या आंदोलनांची नेमकी कल्पना आपल्याला स्वत:लाही नसते; त्यामुळे एखाद्या त्रयस्थ माणसाने दुसऱ्या कोणाच्या मानसिकतेविषयी निश्चित स्वरूपात काही सांगणे खूप अवघड आहे. प्रत्येक घटनेमागे केवळ एकच एक कारण असते अजुनी चालतोची वाट... ४११