पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकारच्या सार्वजनिक पदांची जबाबदारी घ्यायची नाही आणि उर्वरित आयुष्य फक्त लेखन-वाचनात घालवायचे असे त्यांनी ठरवले होते. आणि खरे सांगायचे तर अवघ्या चौदा दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे साजच्या केल्या गेलेल्या ऐंशीव्या वाढदिवशी त्यांनी तो निर्णय जाहीरही केला होता. विशेष म्हणजे त्या समारंभाला शरदराव व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई दोघेही हजर होते. आणि आता अवघ्या दोन आठवड्यांत आपणच आपला शब्द फिरवायचा? लोक काय म्हणतील? आयुष्यभर सत्तेपासून दूर राहिल्यानंतर आता शेवटी म्हातारपणी यांना सत्तेचा मोह पडला, असे तर सगळे म्हणणार नाहीत ना? शिवाय आपल्यालाही ही जबाबदारी झेपेल का ? एकीकडे नियोजित कार्यक्रमाचे सोपस्कार पार पाडत असतानाच दुसरीकडे त्यांच्या मनात ही सगळी खळबळ माजली होती. पण सकाळच्या लख्ख उन्हात लकाकणाऱ्या समोरच्या कर्मवीरांच्या पुतळ्याकडे पाहता पाहता हळूहळू त्यांना समोरचा रस्ता स्पष्ट दिसू लागला. संस्थेच्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे यथावकाश पुढील अधिकृत बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी चेअरमन निवडायचा मुद्दा समोर आला. शरदरावांनी रावसाहेबांचे नाव पूर्वीच सुचवले होते. योग्य ते सोपस्कार पार पाडले गेल्यावर त्यानुसार रावसाहेबांची चेअरमनपदी अधिकृतरीत्या निवड झाली. ध्यासपर्व हे रावसाहेबांचे आत्मकथन जानेवारी २००५ मध्ये प्रथम प्रकाशित झाले; म्हणजे त्याचे लेखन बहुधा २००४मध्ये झाले असणार. त्यावेळची रावसाहेबांची मनःस्थिती कशी निराशेकडे झुकत चालली होती याची वर उद्धृत केलेल्या उद्गारांवरून आपल्याला कल्पना येते. पण रयतच्या मर्यादांची जाणीव असूनही रयतचे मोठेपण रावसाहेब पुरेसे ओळखून होते व म्हणूनच त्यांनी रयतमधून त्यावेळी राजीनामा दिला नसावा. रयतचे चेअरमनपद स्वीकारण्यापूर्वी रावसाहेबांनी बराच साधकबाधक विचार केला असणार हे उघड आहे. यापूर्वीच्या आयुष्यात ते सातत्याने सत्तेच्या पदापासून दूर राहिले होते. मग आता, २००८ साली, ऐंशी वर्षांचे झाल्यानंतर, त्यांनी रयतचे चेअरमनपद का स्वीकारले असेल? आणि तेही जेमतेम चौदा दिवसांपूर्वी आपली सार्वजनिक जीवनातली निवृत्ती जाहीर केल्यानंतर ? याचे विश्लेषण करायचा प्रयत्न केला तर काही कारणे सुचतात. एकतर ज्या संस्थेतला आपला सहभाग केवळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झाला, त्या संस्थेचे प्रमुखत्व भूषवणे ही कोणाही माणसाला अगदी स्वाभाविकपणे खूप आनंद व्हावा, आपल्या वाटचालीचे सार्थक झाल्यासारखे अजुनी चालतोची वाट... ४१०