पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ अजुनी चालतोची वाट दिनांक ९ मे ००८ची ही घटना साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात या दिवशी नेहमीच मोठी धामधूम असते. कारण हा संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन. सकाळी कार्यालयासमोरील कर्मवीरांच्या पुतळ्याला वंदन करायचा कार्यक्रम होतो. त्यानंतर समाधिप्रांगणात सर्व उपस्थितांसाठी एक मेळावा होतो. त्याचप्रमाणे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभाही असते. संस्थेचे प्रेसिडेंट शरदराव पवार सातायात दाखल झाले होते व नेहमीप्रमाणे सर्किट हाउसच्या स्वीट क्रमांक एकमध्ये त्यांचा मुक्काम होता. हातातले कागदपत्र चाळण्यात आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात ते गर्क होते. कार्यक्रमाची वेळ झाली तशी मंडळी उठली. सर्किट हाउसच्या गेटमधून भराभरा गाड्या बाहेर पडल्या. इकडे रयत संकुलात पुतळ्यासमोर बरीच गर्दी जमली होती. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरू झाला. शरदरावांसोबत अॅड. रावसाहेब शिंदेही होते; व्हाइस चेअरमन या नात्याने आपली औपचारिक जबाबदारी पार पाडत होते. पण त्यांच्या डोक्यात मात्र विचारांचे प्रचंड काहूर उठले होते. "तुम्ही आता चेअरमन व्हा, " असे कालच शरदरावांनी सुचवले होते. त्यावर काय प्रतिसाद द्यावा याविषयी रावसाहेबांच्या मनात खूप खळबळ माजली होती. त्या सुमारास रयतच्या एकूण कामाबद्दल आणि त्या वातावरणात आपण काय करू शकू याबद्दल ते काहीसे निराश झाले होते व त्याचे प्रतिबिंब त्यांच्याध्यासपर्व या आत्मकथनातही आपल्याला जाणवते. "ज्या संस्थेच्या कामात मी गेले सुमारे अर्धशतक सहभागी झालो आणि त्यातही गेली पंचवीस वर्षे पूर्ण वेळ देऊन तन, , धनाने ते काम करत राहिलो, त्याची फलनिष्पत्ती काय, या प्रश्नाचे निराशाजनक उत्तर पुढे येते. " हे त्यांचे 'ध्यासपर्व'मधील उद्गार पुरेसे बोलके आहेत. एक प्रकारची उद्विग्नता त्यांचे मन व्यापून राहिली होती. आता यापुढे कुठल्याही मन, अजुनी चालतोची वाट... ४०९ -