पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसऱ्याच दिवशी ते उत्साहाने सरांच्या घरी गेले. वर्गातली इतरही पाच-सहा मुले तिथे आली होती. गेल्या गेल्या "पैसे कुठे आहेत?" असे सरांनी विचारले. रावसाहेब बावचळले. "दोन रुपये पाहिजेत ! महिन्याची ती फी आहे!" सरांनी सुनावले. आता रावसाहेबांच्या डोक्यात प्रकाश पडला. आधी त्यांच्या डोळ्यांपुढे देवठाणच्या तोरकडी मास्तरांची 'शिकवणी' होती. तेही रावसाहेबांचा स्वतंत्र असा स्कॉलरशिपचा अभ्यास करून घ्यायचे; पण त्याबद्दल त्यांनी कधी एक पैसाही घेतला नव्हता. इथेही तेच घडेल अशी रावसाहेबांची कल्पना होती. शिकवणी हाही एक धंदा आहे, हे त्यांना आयुष्यात प्रथमच कळत होते. रावसाहेबांकडे शिकवणीसाठी अर्थातच पैसे नव्हते. संतापलेल्या सरांनी लगेच त्यांना घराबाहेर काढले. यानंतर सरांचा राग अधिकच वाढला. त्या रागात तिरस्काराचीही भर पडली. वर्गात सगळ्या मुलांसमोर ते रावसाहेबांना घालूनपाडून बोलू लागले, हिणवू लागले. तो अपमान रावसाहेबांना सहन होत नसे. आजवरच्या आयुष्यात त्यांना कधीच कोणी इतके लागट बोलले नव्हते. शिवाय आपले दुःख एखाद्याशी बोलून हलके करावे असा कोणी जवळचा मित्रही सिन्नरमध्ये नव्हता. घरी काहीच बोलायची सोय नव्हती. रात्री अंथरुणात पडले की त्या सगळ्या आठवणीने त्यांना रडू आवरत नसे; पण एकाच छोट्या खोलीत सगळे झोपत असल्याने मोठ्याने रडायचीही सोय नव्हती; गुपचूप हुंदके दाबत कसेबसे आतल्या आत रडावे लागे. रवीन्द्रनाथ एक दिवस अभ्यासक्रमात नेमलेले तर्खडकरांचे 'भाषांतरपाठमाला' हे पुस्तक ते चाळत होते. त्याचे लेखक द्वारकानाथ राघोबा तर्खडकर हे आद्य मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग यांचे पुतणे. शिक्षणखात्यात ते उच्चाधिकारी होते. तर्खडकर कुटुंब मोठे होते व या कुटुंबाला मुंबईत बऱ्यापैकी प्रतिष्ठा होती. गोरे १८७८ मध्ये सर्वप्रथम इंग्लंडला गेले तेव्हा तिथे जाण्यापूर्वी इंग्रजी शिष्टाचार त्यांच्या अंगवळणी पडावेत म्हणून त्यांचे थोरले बंधू व पहिले भारतीय आयसीएस अधिकारी सत्येन्द्रनाथ यांनी त्यांची याच तर्खडकर कुटुंबात तीन महिन्यांसाठी राहण्याची सोय केली होती. मराठी माध्यमातील मुलांना इंग्रजी शिकणे सुलभ जावे म्हणून आपल्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार द्वारकानाथ तर्खडकरांनी 'भाषांतरपाठमाला' हे पुस्तक तीन छोट्या भागांत लिहिले. ते पुस्तक चाळताचाळता रावसाहेबांना खूप भावले व त्याच्या आधारे स्वतःच इंग्रजी शिकायचा रावसाहेबांनी निर्धार केला. गावातल्या निवांत अशा गोंदेश्वराच्या मंदिरात ते रोज सकाळी व संध्याकाळी मुख्यतः इंग्रजीच्या अभ्यासासाठी जाऊ लागले. सदूबाबाच्या घरी किंवा वखारीत परगावच्या शाळेत ४१