पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणू शकू. जेव्हा तुम्ही एखाद्या आदर्श समाजरचनेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवता, काही नैतिक मूल्यांच्या संवर्धनासाठी झटत असता, तेव्हा साहित्यातील कलात्मकतेपेक्षा साहित्याची प्रबोधनक्षमता हीच तुम्हांला अधिक महत्त्वाची वाटत असते; कारण तुमच्या अन्य जीवनाप्रमाणेच तुमची साहित्यनिर्मितीही समाजपरिवर्तनासाठीच कामी यावी अशीच तुमची स्वाभाविक इच्छा असते. अशा साहित्याचेही योगदान, विशेषत: भारतासारख्या विकसनशील समाजात, खूप महत्त्वाचे असते. रावसाहेबांचे सर्व साहित्य म्हणजे वाचकांची तहान भागवणारी एक प्रबोधनसरिताच आहे. ■ अजुनी चालतोची वाट... ४०८