पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिव्हाळ्याचे संबंध राहिले असले, तरी त्यांची सर्वाधिक जवळीक यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर व ग. दि. माडगूळकर या तीन साहित्यिकांबरोबर होती. तिघेही रावसाहेबांच्या कुटुंबाचेच सदस्य बनून गेले. रावसाहेबांप्रमाणेच हेही नैतिकतेला खूप महत्त्व देणारे होते हे यामागचे एक प्रमुख कारण असावे. वकिली व्यवसायातून निवृत्त व्हायचा निर्णय पंचवीस एक वर्षांपूर्वी जेव्हा रावसाहेबांनी घेतला, तेव्हा वाचनासाठी आणि लेखनासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा अशी त्यांची इच्छा होती. अण्णासाहेबांबरोबर त्यांची याबाबत काही वेळा चर्चाही झाली होती. त्यांची सर्वच पुस्तके या निवृत्तीनंतरच्या काळात निघाली आहेत. पण त्यांच्या लेखनासाठी, त्यासाठी आवश्यक अशा वाचनासाठी व मुख्य म्हणजे चिंतनासाठी ते पुरेसा वेळ देऊ शकले का? त्यांच्या मनात होते त्या प्रकारचे व त्या दर्ज्याचे लेखन त्यांच्या हातून झाले का? या प्रश्नांची उत्तरे देणे तसे अवघड ठरेल. 'ध्यासपर्व' मधील काही उणिवा दाखवणारे एक पत्र वसंतराव पळशीकर यांनी लिहिले होते. त्याला उत्तर म्हणून लिहिलेल्या ७ जून २००५च्या पत्रात रावसाहेब लिहितात : ॥ "ध्यासपर्व लिहिताना वेळेचा मेळ घालण्यात माझी दमछाक झाली. काही वेळेस चार-चार, सहा-सहा महिन्यांचा काळ जायचा. लिखाण होत नसे. नवीन लिहिताना मागचे संदर्भही तपशिलात आणि अगदी अचूक लक्षात न राहण्याचे प्रसंग उद्भवत. त्यामुळे कधी कधी द्विरुक्ती तर कधी कधी हे लिहिले असे समजून ते वगळले जायचे. सलग लिहिणे अशा तऱ्हेने कमी. नियोजन तर काहीही नव्हते. त्यामुळे लिखाण वाचकाकडून वाचले जाणार नाही इतके लांबडे झाले. परिणामी माझ्या लग्नापासून प्रपंच, शेती, घरी येणारी व क्षेत्रातल्या मित्रांची मांदियाळी, त्यांचे टिपावेत असे प्रसंग व व्यक्तिवैशिष्ट्ये, शेतीच्या व्यवसायात व प्रापंचिक जगात आलेले विविध अनुभव, त्या अनुषंगाने अर्थकारण, समाजकारण इत्यादी अनेकविध बाबी यांना मी स्पर्श करू शकलो नाही. कौटुंबिक जीवनाचेही तेच ! परदेशप्रवास, भारतातला प्रवास या बाबी तर स्वतंत्र पुस्तकाचा विषय; पण ते होणे नव्हते. झाले तेच अनपेक्षित आणि पुष्कळ झाले, या भावनेने या पुस्तकाचा प्रपंच आवरता घ्यावा लागला. मणारी विविध एक मात्र जाणवते. जनमानसात कार्यरत असताना वाचन-लेखन- वैचारिक चिंतन, मनन या बाबी खूपच दुर्लक्षित होतात. माणसांच्या गराड्यात राहण्याची गरजही असते आणि पुढे पुढे माणूस मनानेही त्यात अडकला जातो. ज्याला अजुनी चालतोची वाट... ४०६