पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संक्षेपीकरणामागे अल्पाक्षररमणीयत्वाचा विचार नसून लिहिण्याचा आळस आहे हे उघड आहे! जेव्हा एसएमएस पुरेसा नसतो व इमेलचा आश्रय घेतला जातो तेव्हाही शब्दांचा वापर अगदी कमीतकमी. ज्यांना पत्रे लिहायला व वाचायला आवडतात त्यांच्या दृष्टीने 'संवादपर्व' नुसते चाळणे हेही आनंददायी आहे. रावसाहेबांना आलेली (किंवा त्यांनी लिहिलेली) अशी सुमारे पाच हजार पत्रे ( किंवा त्यांच्या स्थळप्रती) त्यांच्या श्रीरामपूर येथील घरात संग्रहित आहेत. १९५५ ते २०११ या प्रदीर्घ कालखंडातील ही पत्रे आहेत. त्यांतील सुमारे तीनशे इंग्रजीतली आहेत. हा सगळा पत्रव्यवहार इतकी वर्षे सांभाळून ठेवल्याबद्दल त्यांच्या पत्नी सौ. शशिकलाताई यांचे कौतुक करायला हवे. कारण त्यामुळेच हा एक महत्त्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. दस्तावेजीकरणाला (डॉक्युमेंटेशनला ) आपण भारतीयांनी पुरेसे महत्त्व कधीच दिलेले नाही. अनेक महत्त्वाची ऐतिहासिक कागदपत्रे अडगळीत कुठेतरी फेकून दिल्याचे, बऱ्याचदा वाळवी लागून ती नष्टही झाल्याचे आपल्याकडचे अनेक प्रकार वि. का. राजवाडे व दत्तो वामन पोतदार यांच्यासारख्या विख्यात इतिहास संशोधकांनी नमूद करून ठेवले आहेत. इंग्रज आपल्यापेक्षा इतके वरचढ ठरले याची जी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी पु. ग. सहस्रबुद्धे यांनी नोंदवलेले एक कारण म्हणजे दस्तावेजीकरणाबद्दलची आपली अनास्था प्रत्येक इंग्रज अधिकारी आपले अनुभव रोजनिशीत नोंदवून ठेवायचा, संबंधित कागदपत्रे जपून ठेवायचा व नंतर आलेल्या अधिकाऱ्याला ही मोलाची माहिती सहजगत्या उपलब्ध झाल्याने त्यापासून योग्य तो बोध घेऊन तो अधिक कुशलतेने कारभार करायचा. याउलट पूर्वसुरींच्या अनुभवाचा असा फायदा भारतीय कारभाऱ्यांना मिळत नसे; कारण व्यात कागदपत्रे पुढच्यांना सहजगत्या उपलब्ध होतील जतन करायची पद्धत नसे. (पोवाडे किवा बखरी यांचे महत्त्व या दृष्टीने फारसे नाही, कारण राज्यकर्त्यांच्या स्तुतीपलीकडे त्यांत फारसे काही हाती लागत नाही.) त्यामुळे आपल्या प्रत्येक कारभाच्याला नव्याने श्रीगणेश करावा लागे, शून्यातून सुरुवात करावी लागे. Reinventing the wheel म्हणतात, त्यातलाच हा प्रकार होता व त्यामुळे क्रमाक्रमाने होत राहणाऱ्या स्वाभाविक प्रगतीपासून आपण वंचित राहिलो; प्रगतिपथावर पुढची वाटचाल करू नाही शकलो. एखादे छोटेसे पत्रसुद्धा कधीकधी महत्त्वाचा दस्तावेज ठरू शकते. काही वर्षांपूर्वी नाशिकमधील एका वाचकाने पाठवलेले पत्र 'अंतर्नाद' मध्ये प्रकाशित झाले होते. एका पोस्टकार्डाविषयीची त्यात माहिती होती. नाशिकमधल्या एका अजुनी चालतोची वाट... ३९६