पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे हे दाखवणारे अनुभव या लेखांत आहेत. उदाहरणार्थ, 'सांस्कृतिक श्रीमंती' या लेखातील अमेरिकेत मोटरवेने केलेल्या प्रवासाचे हे वर्णन : "अमेरिकेत अनेक राज्यांत मोटारगाडीने फिरण्याची संधी मिळाली. तिथले सगळे रस्ते पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, उत्तर असे अगदी भूमितीच्या सरळ रेषेइतके सरळ तर होतेच, पण विशेष म्हणजे रस्त्यावर कोठेही लहानसादेखील खाचखळगा दिसत नव्हता. प्राणी असलेल्या जंगलातून जेथे रस्ता जातो, तेथे प्राण्यांना जपण्याची संस्कृती जपली जात होती. तसे बोर्ड रस्त्यावर लावलेले होते. एखादा प्राणी किंवा त्यांचा कळप कधी क्वचित रस्त्यात आलाच, तर सगळ्या गाड्या जागीच ठप्प उभ्या राहात, अजिबात आवाज न करता. इंजिन बंद, हॉर्न बंद, बोलणे बंद. प्राणी बरेच दूर निघून गेल्यावरच गाड्या चालू होत. मला ही एकप्रकारची सांस्कृतिक श्रीमंती वाटली. " 'प्रश्न आहे मूल्यांचा' या पुस्तकाच्या सातव्या भागात 'तेजोकण विदेशातले ' या शीर्षकाखाली विदेशप्रवासातील काही वेधक समाजनिरीक्षणे नोंदवलेली आहेत. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असूनही पाण्याची टंचाई अशी कुठेच का जाणवत नाही, त्यासाठी त्यांनी आपल्याकडे विजेचे असते तसे पाण्याचे ‘कॉमन ग्रिड' कसे तयार केले, सगळ्या राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक ठरू शकेल असे हूवरसारखे प्रचंड धरण कोलोराडोसारख्या महाकाय नदीवर असंख्य आव्हानांना तोंड देत चार वर्षांत कसे उभारले व त्याचा त्या देशाला किती फायदा झाला, बारीकसारीक वादांमध्ये अडकून न पडता त्यांनी भव्य असे दीर्घ पल्ल्याचे नियोजन कसे केले व ते काटेकोरपणे कसे अंमलात आणले याविषयी त्यांनी लिहिले आहे ते आपल्या देशाच्या दृष्टीने खूपच उद्बोधक आहे. 'युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ इंटिरियर – ब्युरो ऑफ रिक्लमेशन' या संस्थेकडे देशाचे जवळजवळ संपूर्ण पाणी व्यवस्थापन सोपवलेले आहे. या संस्थेच्या येथील कार्यालयाला व तेथील भव्य अशा प्रयोगशाळेला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांना बरीच उपयुक्त माहिती मिळाली व त्या आधारे त्यांनी लिहिले आहे. - व्हर 'हॉलंड नव्हे गवळीवाडा' हा त्यांचा लेखही असाच उपयुक्त माहितीने भरलेला आहे. रावसाहेब स्वतः या व्यवसायाशी दीर्घकाळ संबंधित असल्यामुळे त्यांना याबाबत साहजिकच कुतूहल होते व या व्यवसायाची थोडीफार पाहणी करायची संधीही त्यांना हॉलंडमध्ये मिळाली. तिथल्या धष्टपुष्ट गायींचे कळप, त्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला सांभाळ, अत्याधुनिक यंत्रांचा वापर, तिथले तीस हजार डेअरी फार्म्स, त्यातून दरसाल होणारे अकरा बिलियन किलो दुधाचे उत्पादन हे सारेच त्यांना थक्क करणारे वाटले. सगळा देशच त्यांना एखाद्या महान साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३९३