पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होता. गदिमा काँग्रेसचे सदस्य. सरकारने त्यांची आमदार म्हणून नियुक्तीही केली होती. रावसाहेबांप्रमाणे त्यांनाही गप्पागोष्टींची खूप आवड. त्यामुळे दोघांमध्ये चांगलाच स्नेह जुळून आला. काही महिन्यांनंतर प्रवरा सहकारी साखर कारखान्यातील ओपन थिएटरचा उद्घाटन सोहळा कारखान्याचे चेअरमन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी आयोजित केला होता. त्यांच्या विनंतीवरून रावसाहेबांनी आपल्या साहित्यिक मित्रांना आमंत्रित केले होते. गदिमांच्याच हस्ते ओपन थिएटरचे उद्घाटन झाले. रावसाहेब म्हणतात, "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्रावरील व्याख्यानमाला श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात मी उत्साहाने पुढाकार घेतला. विशेषतः त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद मी काही सहकारी संस्थांच्या मदतीने सहजासहजी करू शकलो. सलग सात दिवस ही व्याख्यानमाला चालली. व्याख्यानाच्या वेळेपूर्वी श्रीरामपूरचे सर्व रस्ते माणसांनी फुलून जात. श्रोते मंत्रमुग्ध होत. राजाभाऊंच्यामुळे यदुनाथ थत्ते यांच्याशीही माझी ओळख होऊन स्नेहभावाचे संबंध जुळून आले. यदुनाथ थत्ते यांची मुलांच्या समोर बोलण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण हातोटी असायची. भाषणाच्या सुरुवातीला अथवा शेवटी शेवटी अर्थपूर्ण गाणी म्हणून ते श्रोत्यांना ती आपल्या मागे म्हणायला लावीत. राजाभाऊ व यदुनाथ हे दोघेही ध्येयवादी साहित्यिक. दोघेही अतिशय कळकळीने, खूप परिश्रम घेऊन, स्वतःच्या सोईची व आरामाची तमा न बाळगता महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्यामध्ये कथा, गाणी, भाषणे याद्वारे प्रबोधन करीत असत. त्यांचे बरेच कार्यक्रम मी शाळा, महाविद्यालयांतून आयोजित केले. हे दोन्हीही साहित्यिक कधीही मानधन न मागणारे, किंबहुना त्याची अपेक्षाही न करणारे. तथापि मी मात्र त्यांना मानधन मिळेल याकडे क्षाने लक्ष देत }} महाराष्ट्र साहित्य परिषदेची श्रीरामपूर शाखाही रावसाहेबांच्याच अध्यक्षतेखाली सुरू झाली व पुढे कैक वर्षे ते या शाखेचे अध्यक्ष राहिले. या शाखेतर्फेही दरवर्षी अनेक साहित्यिक उपक्रम सातत्याने होत आले आहेत. लहानपणापासूनच त्यांना वाचनाइतकीच वक्तृत्वाचीही आवड. लेखनात वाचकांशी थेट संवाद साधलेला नसतो; शब्दांच्या माध्यमातूनच तो लेखक वाचकांना भिडतो; नाही म्हटले तरी त्यात थोडे दूरत्व येतेच. वक्तृत्वात मात्र हा श्रोत्यांबरोबर साधलेला संवाद थेट असतो; जिवंत असतो. त्याक्षणीच श्रोत्यांपर्यंत जाणारा असतो. 'या हृदयीचे त्या हृदयी' त्याक्षणीच (आजच्या परिभाषेत 'रिअल साहित्यशारदेच्या प्रांगणात... ३८३