पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे चालवला. आजही टीव्हीवर एखादा कार्यक्रम बघताना एखाद्या पाश्चात्त्य देशाचा राष्ट्रप्रमुख अगदी सहजगत्या आपली बॅग स्वत:च्या हाताने उचलताना किंवा स्वतःच आपली मोटार चालवताना किंवा बाजारात काही किरकोळ वस्तूंची खरेदी करताना किंवा स्वतःच्या हाताने चहा बनवून घेताना देताना आपण बघतो. हे सर्व त्या समाजाच्या इतक्या अंगवळणी पडले आहे, की यात काही विशेष आहे असे त्यांना कोणाला वाटतही नाही. आपल्याकडे मात्र राष्ट्रप्रमुख सोडाच, एखादा दुय्यम तिय्यम पातळीवरचा नेताही यांतले एकही काम स्वहस्ते करताना आपल्याला दिसत नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित समाज बनायचे असेल तर हे सारे बदलायला हवे. श्रमप्रतिष्ठा हा विकसित समाजाचा एक महत्त्वाचा विशेष असतो. त्या श्रमप्रतिष्ठेचा व्यक्तिप्रतिष्ठेशी निकटचा संबंध असतो आणि समानतेशीही निकटचा संबंध असतो. मोठमोठी मानवी मूल्ये केवळ त्यांचा तोंडाने उल्लेख करून अंगी बाणत नाहीत, समाजात रुजत नाहीत. त्यासाठी साध्यासाध्या दैनंदिन गोष्टींमध्ये ती आचरणात आणावी लागतात. रयत म्हटले की सर्वांत आधी 'कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा मंत्र डोळ्यांपुढे उभा राहतो. त्या मंत्राचा आजच्या काळाला अनुरूप असा आविष्कार रयतला दाखवावा लागेल. शरीरश्रमांचे महत्त्व आजच्या सुखासीन विद्यार्थ्यांना पटवावे लागेल. हातांचा वापर का आणि कसा करायचा हे दाखवण्याचे कल्पक मार्ग शोधावे लागतील. हे सोपे नाही पण खूप महत्त्वाचे मात्र नक्की आहे. सामाजिक परिवर्तनासाठी रयतने दिलेले ते खूप मोठे योगदान ठरेल. शेवटी एक गोष्ट नमूद करायला हवी. रावसाहेबांची खरी खंत ही रयतच्या संदर्भातली नाही. ती खूप खोलवरची आणि अगदी मूलभूत स्वरूपाची अशी खंत आहे. एकदा ते प्रस्तुत लेखकाला सांगत होते : "स्वातंत्र्यानंतर एकदा काँग्रेसचे एक प्रमुख नेते बाळासाहेब देसाई कर्मवीरांकडे गेले व म्हणाले, 'शिक्षकांचे पगार द्यायची, त्यासाठी पैसे गोळा करायची, 'कमवा आणि शिका' यांसारख्या योजनांतून मुलांनी फी उभारायची तुमची सगळी कटकट आता सरकारने दूर : केली आहे. आता सरकारच पगार देईल, सगळा खर्च करेल आणि गरीब मुलांना फीसुद्धा पूर्ण माफ असेल. तुमचे सगळे कष्ट आता संपले. ' हे ऐकून कर्मवीर खूष होतील अशी बहुधा मंत्रिमहोदयांची अपेक्षा होती. पण हे त्यांचं बोलणं ऐकून कर्मवीर खूप उद्विग्न झाले. दुःखातिरेकाने आपला तळहात अजुनी चालतोची वाट... ३७४