पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साली फरिदाबाद येथील राष्ट्रीय विज्ञान कार्यशाळेत महाराष्ट्रातले जे शोधनिबंध निवडण्यात आले त्यांपैकी बरेच शोधनिबंध रयतच्या शिक्षकांचे होते ही घटना उत्साहवर्धक आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शैक्षणिक विभागाचे काम सौ. सुप्रिया सुळे या सांभाळतात. त्यांच्यातर्फे मुख्याध्यापकांची गुणवत्ता उंचावावी या दृष्टीने नामवंत शिक्षणतज्ज्ञांच्या सहकार्याने सातत्याने व विभागशः तीन दिवसांची शिबिरे आयोजित केली जातात. रयतचा या शिबिरांमधला सहभागही खूप उपयुक्त ठरला आहे. शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या संदर्भात इंग्रजी माध्यमाचा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल. इंग्रजी ही जागतिक पातळीवरील ज्ञानभाषा बनली आहे. आपल्या मातृभाषा महत्त्वाच्या आहेत यात काहीच वाद नाही, परंतु आयुष्यात पुढे जायचे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही; उगाच आपण वादासाठी वाद घालत बसलो तर आपल्याच भावी पिढ्यांचे नुकसान होणार आहे. बहुतेक नवे संशोधन आज इंग्रजीतूनच प्रकाशित होत आहेत आणि त्याचे प्रमाण इतके अफाट आहे, की आपली सगळी शक्ती पणाला लावली तरी त्यातला पाच टक्के मजकूरही मराठीत अनुवादित करणे केवळ अशक्य आहे. बाहेर भाषणे करताना इंग्रजीला जोरदार विरोध करणारेही स्वतःच्या मुलांना आणि नातवंडांना मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालत असतात. घरकाम करणाऱ्या बायकांना आणि भूमिहीन शेतमजुरांनाही आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेतच शिकावे असे वाटत असते आणि त्यासाठी कर्ज काढायचीही त्यांची तयारी असते. इंग्रजी माध्यमाला एकेकाळी जोरदार विरोध करणाऱ्या फ्रान्ससारख्या देशांनीही आज आपल्या मुलांना इंग्रजीतूनच शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. आजवर रयतच्या जवळजवळ सर्वच शाळा या मराठी माध्यमाच्याच आहेत. रयतची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता कदाचित त्या काळात अपरिहार्यही होते. पण भविष्यात मात्र काळाची पावले उचलून रयतला मोठ्या प्रमाणावर इंग्रजीकडे लक्ष पुरवावे लागेल. ॥ यात अनेक अडचणी असणार हे तर उघड आहे. रयतचे एक प्राचार्य यासंबंधी चर्चा करत असताना म्हणाले, "रयतच्या अनेक शाळा अगदीच अविकसित भागात आहेत. इंग्रजी शाळांसाठी पोषक असे वातावरण तिथे नाही. घरीदारी, अवतीभवती इंग्रजीत संभाषण करू शकणारेही कोणी नाहीत. रयतच्या बहुसंख्य शाळांमधील परिस्थिती अशीच आहे. आता पुण्यासारख्या काही मोठ्या शहरांमध्ये रयतच्या काही शाळा आहेत, पण तिथे येणारी बहुसंख्य मुले ही समाजाच्या अगदी खालच्या स्तरातली आणि इंग्रजीचा गंधही नसणाऱ्या कुटुंबातली असतात. अशा पार्श्वभूमीतल्या मुलांना इंग्रजी येणार कसे? अशाही परिस्थितीत आम्ही इंग्रजी कर्मवीरांच्या वाटेने ... ३६९