पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करत बसण्यापेक्षा नव्या, आधुनिक आणि कमी देखभाल लागण्याच्या मोटारी खरेदी करण्यात काय गैर आहे? संस्थेसाठी उत्तम सभागृहे, ग्रंथालये, शौचालये उभारणे ही काही उधळपट्टी नव्हे. वेगवेगळ्या सुविधांसाठी आपण विद्यार्थ्यांकडून रिझनेबल फी घ्यायलाही काय हरकत आहे? पालकांचीही त्यासाठी आनंदाने तयारी आहे. पण आमच्यापैकीच काही जण अशा कुठल्याही प्रस्तावाला कडाडून विरोध करतात. अगदी संगणकशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून महिना चाळीस रुपये फी घ्यायचे ठरवले, तर त्यालाही हे लोक विरोध करतात. " " अर्थात हे आधुनिकीकरण केवळ चकचकीत इमारती आणि सुळसुळीत मोटारींपुरते सीमित नसावे, तर संस्थेच्या एकूण कार्यपद्धतीतच कालानुरूप बदल घडवणारे असावे. रयतच्या बैठकांमध्ये होणाऱ्या वेळेच्या अपव्ययाविषयीची रावसाहेबांची टीका मागे उद्धृत केली आहे; तसा अपव्यय टाळणे, वेळेचे अधिक चांगले नियोजन करणे हाही आधुनिकीकरणाचाच एक भाग आहे. त्यासाठी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगसारख्या सुविधा वापरल्या गेल्या पाहिजेत. एमकेसीएलमार्फत रयतने केलेल्या 'ऑनलाइन' भरतीबद्दल पूर्वी लिहिलेलेच आहे. संस्थेच्या एका महत्त्वाच्या कामाच्या आधुनिकीकरणाचाच तो प्रकार आहे आणि आयटीचा असा वापर संस्थेच्या सर्वच कामांमध्ये व्हायला हवा. रयतसारखी जुनी व प्रस्थापित संस्था नित्यनूतन आणि चैतन्यमय राहण्यासाठी ती काळानुरूप बदलत राहणे, स्वतःला पुनःस्थापित (re-invent) करत राहणे आवश्यक आहे. रयतपुढचे चौथे आव्हान अध्यापनाचा दर्जा उंचावण्याचे आहे. रयतची पारंपरिक प्रतिमा ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणारी संस्था ही आहे आणि ती उचितही आहे. ज्या भागात शिक्षण कधी पोचलेच नव्हते त्या भागात शिक्षणाची गंगा नेऊन पोचवणे हे हत्त्वाचे पण आज शिक्षणाचा प्रसार सर्वदूर झाला आहे. रयतप्रमाणेच इतरही अनेक संस्था ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण महाराष्ट्रातील बापूसाहेब साळुंखे यांच्या स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य किंवा विदर्भातील पंजाबराव देशमुख यांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्य ग्रामीण शिक्षण प्रसाराचेच आहे. सरकारी शाळांचे जाळे तर यांच्या अनेक पटीने अधिक पसरलेले आहे. पण आज खरी गरज आहे ती केवळ शिक्षणाची नव्हे, तर दर्जेदार शिक्षणाची. दरवर्षी 'प्रथम' सारखी स्वयंसेवी संस्था शालेय शिक्षणाचा दर्जा मापण्याचे काम करत असते आणि 'असर' या नावाने प्रसिद्ध होणारा त्यांचा वार्षिक अहवाल शिक्षणातल्या प्रचंड खालावलेल्या दर्ज्याचे अतिशय विदारक असे चित्र उभे करतो. वृत्तपत्रांतून आपण सगळेच त्याबद्दल कर्मवीरांच्या वाटेने... ३६७