पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनाने विचार करायला हवा. मूठ-मूठ धान्य गोळा करून शाळा चालवणे, देवळात किंवा चावडीवर वर्ग भरवणे, दोन वेळेला जेवायला मिळेल एवढाच पगार घेऊन शिक्षकांनी शिकवणे आणि अंगमेहनतीचे काम करून, घाम गाळून विद्यार्थ्यांनी शिकणे हे मॉडेल आज चालणारे नाही. रयतच्या कार्यक्रमांत कर्मवीरांचे उदाहरण जेव्हा पुनःपुन्हा दिले जाते तेव्हा उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांची काय प्रतिक्रिया होत असेल ? वेतन आयोगानुसार शिक्षकांचा पगार आज तीस-चाळीस हजार सहज असू शकतो. पत्नीही शिक्षका असेल आणि नवरा बायको दोघेही शिक्षक असणे हे खूप प्रचलित (कॉमन) आहे - तर तेवढेच पैसे तीही मिळवते. पती-पत्नी दोघेही प्राध्यापक असतील तर हे उत्पन्न दरमहा दीडएक लाखाच्या वर सहज जाते. निवृत्तिवेतन, नोकरीतली सुरक्षितता, मर्यादित काम, भरपूर सुट्ट्या वगैरे फायदे अलाहिदाच. आणि तरीही हे वेतन आणखी वाढवून मिळावे ही मागणी कायमच असते. - शिक्षणासाठी आज जो पैसा सरकारतर्फे मिळतो (मग तो राज्यशासनातर्फे असो, केंद्रशासनातर्फे असो वा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनसारख्या स्वायत्त संस्थांकडून असो) त्याच्या तुलनेत कर्मवीरांनी प्रयत्नांची शर्थ करून मिळवलेल्या देणग्या (भूतकाळाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरी) तशा अल्पच वाटतात. खरेतर देणग्यांमार्फत मिळणारे रयतचे आजचे उत्पन्न हे शासनातर्फे अगदी विनासायास, हक्काचे म्हणून आणि नियमित स्वरूपात मिळणाच्या अनुदानाच्या तुलनेत नगण्य आहे. एक प्राचार्य सांगत होते, "केवळ फ्रीशिप वाटण्यासाठी आमच्या कॉलेजला यंदा दोन कोटी रुपये मिळाले. इंपोर्टेड-ब्रँडेड स्पोर्ट्स शूज घालणारे आणि महागड्या मोटारसायकली मिरवणारे विद्यार्थीही आज फ्रीशिपसाठी माझ्या मागे लागतात. जेवढं काही फुकट मिळू शकेल तेवढं ओरबाडून घ्यायची त्यांची प्रवृत्ती आहे. आज विद्या शिकायची, राहायची, पुस्तकाची, जेवणाची, सगळ्या प्रकारची सोय कॉलेज सहज करू शकते. अशा परिस्थितीतला विद्यार्थी कशासाठी दगड फोडायला आणि घाम गाळायला तयार होईल ? " , खरे सांगायचे तर हे सारेच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना, पालकांना आणि एकूण समाजालासुद्धा ठाऊक आहे; आणि तरीही रयतच्या संदर्भात सतत त्याग आणि साधेपणा यांचीच चर्चा होते. याबाबतीतली रावसाहेबांची भूमिका तशी व्यवहार्य आहे. संस्थेच्या सातारा येथील मुख्यालयाचे आधुनिकीकरण मुख्यतः त्यांच्याच पुढाकाराने व शरदराव पवार यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे झाले. रावसाहेब म्हणतात, "जिथे गरज असेल तिथे उत्कृष्ट बांधकाम असायलाच हवे. जुन्या मोटारींच्या देखभालीवर सतत खर्च अजुनी चालतोची वाट... ३६६