पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बनवायच्या ते शिकत राहून आपण इलेक्ट्रिसिटीच्या युगात कधीच प्रवेश करू शकणार नाही; आधुनिक जगात प्रवेश करण्यासाठी जुन्याच घोटवलेल्या मार्गांनी जात राहण्यात अर्थ नाही; त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचाच अंगीकार करायला हवा ही सावंत यांची सुस्पष्ट धारणा आहे आणि त्यांनी उभारलेले प्रशिक्षण केंद्रांचे अभूतपूर्व नेटवर्क हा त्याच धारणेचा प्रत्यक्ष आविष्कार आहे. एमकेसीएल व रयत या दोघांच्या सल्लामसलतीतून रयतच्या ४३२ शाळांमधील २,४०,००० विद्यार्थ्यांना संगणकवापराचे निदान प्राथमिक ज्ञान देण्यासाठी एक विस्तृत योजना आखली गेली. हे विद्यार्थी पाचवी ते नववी या इयत्तांमध्ये होते व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आधी १००४ शिक्षक प्रशिक्षित केले गेले. दर २५० विद्यार्थ्यांसाठी पाच संगणक, त्यांना जोडणारा सर्व्हर, इंटरनेट कनेक्शन व ग्रामीण भागातील विजेचा अनियमित पुरवठा लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत एक जनरेटर अशी आखणी झाली. एकूण योजना किमान साडेबारा कोटी रुपयांची होती. आता ही योजना पूर्णतः कार्यान्वित झाली असून रावसाहेबांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतला हा एक मानबिंदूच म्हणावा लागेल. अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणक हाताळता येणे, त्यात थोडेफार प्रभुत्व मिळवता येणे हे मोठेच यश आहे. या संदर्भातली एक आठवण इथे उद्धृत करण्यासारखी आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCLचे) कार्यकारी संचालक विवेक सावंत हे रावसाहेबांच्या जवळिकीतले. कामाच्या निमित्ताने दोघांचा वरचेवर संबंध येतो. तासन्तास चालणाऱ्या त्यांच्या गप्पासत्रांमध्ये सामील व्हायचे भाग्य प्रस्तुत लेखकाच्या वाट्यालाही अधूनमधून आले आहे. सावंत यांना रावसाहेबांमध्ये 'ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणीसंगम' प्रतीत होत असतो. आपली एक आठवण सांगताना ते लिहितात : शैक्षणिक, " संवाद होत राहिला व आमची ओळख परिपक्व झाली. सामाजिक, सांस्कृतिक व सहकारातील कामाचे विविध पैलू समजावून घेता आले आणि रावसाहेबांबद्दल एक आंतरिक जिव्हाळा व प्रेम निर्माण झाले. श्रीरामपूर येथील रयत शैक्षणिक संकुलात पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने जाता आले. कार्यक्रम प्रशस्त हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती असावी म्हणून नेहमी पाहुण्याचे भाषण अगोदर आयोजित केले जाते व त्यानंतर पारितोषिक वितरण केले जाते. प्राथमिक सोपस्कार संपल्यावर रावसाहेब अचानक बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांस प्रेमाचे आवाहन केले. 'आज पाहुणे प्रथम पारितोषिक वितरण करतील व नंतर आपणांस मार्गदर्शन करतील. सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे अजुनी चालतोची वाट... ३६४