पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगणकसाक्षर व संगणकनिरक्षर हा भेद उद्याच्या जगात अधिक निर्णायक ठरणार आहे. इथे संगणक या शब्दात इंटरनेट व एकूणच माहिती तंत्रज्ञान अनुस्यूत आहे. जीवनाचे कुठलेच क्षेत्र आज संगणकाच्या प्रभावापासून अस्पर्शित राहिलेले नाही. ज्ञानमार्गाने वाटचाल करण्याचे सर्वांत मोठे माध्यम आजतरी इंटरनेट हे आहे. हातातल्या मोबाइलवर आज अगदी दुर्गम भागातला शेतकरीही हवामानाची वा अत्याधुनिक बियाणांची माहिती मिळवू शकतो आणि एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत म्हणतात त्याप्रमाणे शिवाजीमहाराज विशाळगडावर सुरक्षित पोचल्याची बातमी पावनखिंडीत लढणाऱ्या एखाद्या आजच्या बाजीप्रभूपर्यंत पोचवण्यासाठी तोफांचे आवाज काढण्याची आज गरज नाही; मोबाइलवरून पाठवलेला एखादा एसएमएसही त्यासाठी पुरेसा आहे! भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेला 'आयटी इज इंडियाज टुमॉरो' हा संदेश यथार्थच आहे. त्या आयटीचा सर्वपरिचित चेहरा असलेला संगणक हा अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचेही हात बळकट करण्याचे, त्याच्या सक्षमीकरणाचे आजचे सर्वांत प्रभावी साधन आहे. महात्मा गांधी आज हयात असते तर त्यांनी संगणकाला 'आधुनिक युगातील चरखा' असेच म्हटले असते. यासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोलाची प्रेरणा दिली व त्यासाठी आवश्यक ते बीजभांडवल उभारण्यासाठी पतंगराव कदम, रामशेठ ठाकूर, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे व एमकेसीएल ही कंपनी यांच्याकडून एकूण चार कोटी रुपयांच्या देणग्याही त्यांनी मिळवून दिल्या. उच्चशिक्षणासाठी विद्यार्थी व रयतसेवक यांना अर्थसहाय्य करावे म्हणून शरदरावांच्या पुढाकारातून एक स्थावरनिधी (कॉर्पस) स्थापन करण्यात आला आहे व त्यासाठीही त्यांनी असेच चार कोटी रुपये उभारून दिले याचाही इथे उल्लेख करावासा टतो. विवेक सावंत व त्यांचे सहकारी यांचा या रयतमधल्या संगणकशिक्षणासाठीचा सहभाग महत्त्वाचा आहे. खरेतर त्यांचा असा सहभाग मिळवणे हे रावसाहेबांचे एक मोठेच यश मानायला हवे. सुरुवातीला रयतबरोबर या प्रकल्पात उतरायला विवेक सावंत उत्सुक नव्हते. एमकेसीएल कंपनीचे स्वतःचे पाच हजारांहून अधिक संगणक प्रशिक्षण केंद्रांचे जाळे महाराष्ट्रभर पसरलेले आहे; मग त्यासाठी रयतची स्वतंत्र प्रशिक्षण यंत्रणा कशाला, हाही एक विचार यामागे असू शकतो. पण शेवटी शरद पवार आणि रावसाहेब यांच्या प्रयत्नांत तेही सहभागी झाले. भारतासारख्या देशाला ज्ञानयुगात प्रवेश करण्यासाठी एखाद्या हनुमानउडीची (क्वांटम जंपची) आवश्यकता आहे. अधिकाधिक चांगल्या मेणबत्या कशा कर्मवीरांच्या वाटेने... ३६३