पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेण्याकडे असतो व त्या देशांच्या समृद्धीचे ते एक प्रमुख कारण आहे. ही परिस्थिती अलीकडची नसून खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. आपल्यापैकी अनेकांना याची जाणीवही आहे; पण दुर्दैवाने त्या दृष्टीने ठोस पावले मात्र आपल्याकडे उचलली जात नाहीत. रयतने जर या क्षेत्रात भरीव असे काही काम केले तर देशभरातील शिक्षणसंस्थांपुढे तो एक आदर्श ठरेल. एक होता कार्व्हर या पुस्तकामुळे मराठी वाचकांना बहुपरिचित झालेले आफ्रिकन-अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. कार्व्हर आपल्या कृष्णवर्णीय बांधवांना सांगत, "If you don't know anything and you have only your complexion to recommend, that means you have no recommendation at all. But if you know something, that means you have recommendation." ( " जर तुम्हांला काहीच येत नसेल, आणि दुसन्याला शिफारसवजा सांगण्याजोगे तुमच्या शरीराच्या वर्णाखेरीज तुमच्याकडे काहीच नसेल, तर तुमच्याकडे कुठलीच शिफारस नाही असे म्हणावे लागेल. पण जर तुम्हांला काही येत असेल, तर त्याचा अर्थ तुमच्याकडे शिफारस करावी असे काहीतरी आहे. ") हे 'शिफारस वजा सांगण्यासारखे काहीतरी' याचाच अर्थ आजच्या परिभाषेत कौशल्य (स्किल) असा आहे. आज देशातील शाळांमधून, विशेषत: ग्रामीण शाळांमधून, विद्यार्थीगळतीचे प्रमाण प्रचंड आहे. पण या ड्रॉप-आउट्समध्येही कुठलेनाकुठले समाजोपयोगी कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे व शक्यही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संगणक अभियंता किंवा शल्यविशारद होणे शक्य नसते; आणि सुदैवाने आवश्यकही नसते. सुतारकामापासून मोबाइलदुरुस्तीपर्यंत असंख्य प्रकारच्या स्किल्सची आज नितांत आवश्यकता आहे. अशा प्रकारची शल्ये शिकवणा-या शाळांना VET (व्होकेशनल एज्युकेशन अँण्ड ट्रेनिंग ) सेंटर म्हणतात व कुठल्याही विकसित राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा तो कणा मानला जातो. अशी केंद्रे चीनमध्ये साधारण पाच लाख आहेत, तर भारतात अवघी ११, २५० - म्हणजेच त्यांच्या दोन टक्केसुद्धा नाहीत. पाश्चात्त्य देशांतील कारखान्यांमध्ये अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांचे प्रमाण सरासरी ७० टक्के असते; भारतात हेच प्रमाण अवघे दोन टक्के आहे. याचा परिणाम थेट कारखान्याच्या उत्पादनावर होत असतो. कुशल मनुष्यबळाच्या अभावी आपल्या देशातील कामगारांची उत्पादकताही (प्रॉडक्टिविटी) खूपच कमी आहे - चीनमधल्या कामगाराची उत्पादकता आपल्या दुप्पट, तर युरोपातील कामगाराची उत्पादकता आपल्या दसपट आहे. उशिरा का होईना, पण आतातरी आपल्या देशातील - कर्मवीरांच्या वाटेने... " ३६१