पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुधारले पाहिजे. भावंडांचे शिक्षण केले पाहिजे व नंतर त्यांनी त्यांचा समाज सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे जर झाले नाही तर आपण त्यांना योग्य तऱ्हेचे शिक्षण दिले नाही असे होईल; कारण ही मुले पुढे इतरांचा विचार न करता केवळ स्वत:चाच विचार करतील.' }} शाळांमधून ज्या प्रकारचे शिक्षण दिले जावे अशी कर्मवीरांची अपेक्षा होती नेमक्या त्याच प्रकारचे शिक्षण त्यांना विद्यापीठांकडूनही अपेक्षित होते. त्यांची अंतिम इच्छा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ग्रामीण विद्यापीठ काढण्याची होती. यासंबंधी त्यांनी सविस्तर अशी कल्पना मांडल्याचे दिसून येत नाही. मात्र अनेक लोकांच्याजवळ ते याचा वारंवार उल्लेख करत असत. कर्मवीर हे ससून हॉस्पिटलमध्ये आजारी असताना या नियोजित ग्रामीण विद्यापीठावर सतत विचार करीत असत. याबाबत त्यांचे काय विचार होते ते त्यांना त्या वेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना सांगावयाचे होते. कर्मवीरांना आपला अंतकाळ जवळ आल्याची चाहूल लागली होती असे दिसते. तेव्हा त्यांनी ससून हॉस्पिटलमधूनच यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिले होते. त्यात कर्मवीरांनी लिहिले होते, "मुंबईस जाताना माझी भेट घ्या, मला ग्रामीण विद्यापीठाबाबत चर्चा करावयाची आहे." परंतु ही भेट होण्यापूर्वीच कर्मवीरांचे निधन झाले. कर्मवीर वारले ९ मे १९५९ रोजी त्यांच्या निधनाला आता ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत, पण कर्मवीरांना अभिप्रेत असलेले ते महात्मा गांधी विद्यापीठ अस्तित्वात आलेले नाही. कर्मवीरांचे हे अखेरचे स्वप्न अपूर्णच आहे. असो. रयतच्या कामात रावसाहेब जसजसे गुंतत गेले तसतसा इतर कुठल्या कामासाठी त्यांच्यापाशी वेळच उरेनासा झाला. ते लिहितात, "वाचन, लिखाण, चिंतन, मनन इत्यादी बाबींना मी पूर्ण पारखा झालो. माझा वकिलीचा व्यवसाय मला हळूहळू कमी करून पुढे पूर्ण बंद करावा लागला. शेतीकडेही दुर्लक्ष होऊ लागल्याने बरीचशी शेतीही मी विकून टाकली. दररोज सुमारे दीडशे-दोनशे लिटर दूध मी डेअरीला पुरवत असे. तो व्यवसायही काळाच्या ओघात मला बंद करावा लागला. अण्णाभाऊ जेव्हा जेव्हा माझ्याकडे येत, तेव्हा तेव्हा मी काय वाचन व लिखाण केले यासंबंधी चौकशी करीत. मी शिक्षण संस्थेच्या कामाच्या नावाखाली पूर्णतया अशैक्षणिक बाबींच्यामध्ये निष्कारण वेळ घालवतो अशी जाणीवही मला ते करून देत. समाजाला उपयोगी पडण्याच्या खोट्या समाधानाखाली मी माझे दिनचक्र बदलू शकलो नाही. आता मावळतीच्या खुणा नजरेत येऊ लागल्यावर आपल्या हातून बरेच काही करायचे राहून गेले, अण्णाभाऊंनी केलेला इशारा मी कर्मवीरांच्या वाटेने ... ३५७