पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परीक्षांचे पेपर्स आणण्यापासून सगळी कामं माझ्यावरच पडली. जो करतो त्याच्यावरच सगळं काम येऊन पडतं असा प्रकार आहे. शिक्षकांच्या मागे नेहमीच सरकार काही ना काही काम लावून देतं. उदाहरणार्थ, सेन्ससचं म्हणजे जनगणनेचं काम घ्या. वेगवेगळे प्रश्न विचारून माहिती गोळा करण्यासाठी तुमच्या घरी जी माणसं येतात तीही बहुतेकदा शिक्षकच असतात. " शिक्षकसंघटनांचे पदाधिकारी तर शिक्षकांच्या बाजूने असे अनेक मुद्दे ठासून मांडत असतात. खासगी शिक्षण संस्था व त्यांचे चालक ही या सर्व चर्चेला असलेली आणखी एक बाजू आहे. 'डोनेशन' च्या स्वरूपात या संस्था विद्यार्थ्यांकडून वसूल करत असलेले पैसे, त्यासाठी त्यांनी मांडलेला शाळा-महाविद्यालयांचा बाजार, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, नेमणूक करतानाच शिक्षकांकडून दोन वर्षांच्या पगाराइतकी रक्कम ‘कॅश'मध्ये घेणे, व्हाउचरवर दाखवलेल्या रकमेपेक्षा खूप कमी रक्कम प्रत्यक्षात पगार म्हणून देणे, आपण पैशाच्या मोबदल्यात खूप दर्जेदार शिक्षण देतो हा पालकांसमोर केलेला फसवा दावा अशा असंख्य बाबींविषयी सतत काही ना काही कानावर येतच असते. शिक्षणसेवक हा असाच आणखी एक गोंधळात टाकणारा प्रकार आहे. रयतमधल्या ४८८ जागांसाठी ७२,६७१ अर्ज आले होते याचा उल्लेख पूर्वी झालाच आहे. याचाच अर्थ एका जागेसाठी तब्बल १४८ अर्ज आले होते; १४८ इच्छुकांपैकी केवळ एकाचेच नोकरीचे स्वप्न साकार होणार होते. शिवाय हे सर्व इच्छुक पदवीधर होतेच, शिक्षक म्हणून काम करण्यासाठी जी किमान पात्रता शासनाने निश्चित केलेली आहे, ती यांच्यात होतीच; पण तरीही नोकरी त्यांच्यापैकी एकालाच मिळणार होती. मग राहिलेल्या ९९.५ टक्के उमेदवारांचे काय हा मोठा गंभीर प्रश्न आहे. या क्षेत्रात किती भयानक बेका आहे हेही यावरून दिसते. वेतन आयोगानुसार वाढलेले शिक्षकांचे पगार सर्वांनाच दिसतात, पण हे बेकारांचे तांडेच्या तांडे दुर्लक्षितच राहतात. यातलेच काही मग 'शिक्षणसेवक' म्हणून काम करतात. म्हणजे काम इतर सर्व शिक्षकांप्रमाणेच; पण मासिक पगार मात्र इतर शिक्षकांचा तीस-चाळीस हजार असेल तर यांचा फक्त तीन चार हजार. म्हणजे कामाचे स्वरूप व शैक्षणिक पात्रता साधारण सारखीच, पण पगारातील तफावत ही एवढी. पण प्रचंड बेकारी असल्यामुळे ही दारुण विषमता सहन करत हजारो तरुण वर्षानुवर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करतात; कधीतरी आपण 'कन्फर्ल्ड' होऊ या आशेवर. आदर्श शिक्षकाच्या आपल्या अपेक्षा हे असले शिक्षक कधीतरी पूर्ण करतील का ? कर्मवीरांच्या वाटेने... ३५५