पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिक्षकांनी तब्बल आठवडाभराची सुट्टी टाकत महाबळेश्वरची वाट धरली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना सोमवारपासून आठवडाभर अनौपचारिक सुटी मिळणार आहे. अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षकांचे हिवाळी पर्यटन होत असून विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होणार आहे. गेल्या वर्षी सिंधुदुर्गला झालेल्या अधिवेशनावरून प्रसिद्धिमाध्यमांतून टीकेची झोड उठवली गेली होती. तरीही पुन्हा एकदा सरकारने अधिवेशनात शाळा बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे. यंदा नऊ आणि दहा जानेवारीला महाबळेश्वरला परिषदेचे अधिवेशन होणार आहे. दरवर्षी या संघटनेच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना रजा दिली जाते. अधिवेशन दोन दिवसांचे असले तरी प्रत्यक्ष अधिवेशनाचे आणि नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी आणि परतण्यासाठी लागणारे दिवस मिळून तब्बल आठवडाभराची रजा टाकून हजारो शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली होणा-या या पर्यटनासाठी गोळा होतात. त्यामुळे, या वर्षीही राज्यातील बहुतांश प्राथमिक शाळा सहा ते अकरा जानेवारी दरम्यान बंद राहतील. " योगायोगाने त्याच सुमारास रावसाहेब पुण्याला आले होते व गप्पा मारता- मारता या बातमीचाही विषय निघाला. त्या संदर्भात बोलताना रावसाहेब म्हणाले : "सलग ३०० दिवस एखादा शिक्षक गैरहजर राहिला तरच त्याच्यावर कारवाई करता येते, एरवी नाही. म्हणजे एखादा शिक्षक २९९ दिवस गैरहजर राहिला, पण तीनशेव्या दिवशी कामावर हजर राहिला, तरीही त्याची नोकरी सुरक्षित राहते. बदली किंवा इतर कुठलीही कारवाई केली तरी त्याविरुद्ध भांडायला त्यांची संघटना तयारच असते." , अर्थात, या सर्व उपरोक्त विवेचनाला शिक्षकांची अशी एक दुसरीही बाजू आहे व अनेक जण ती प्रभावीपणे मांडत असतात. वस्तुनिष्ठपणे एखाद्या प्रश्नाकडे पाहायचे म्हटले म्हणजे दोन्ही बाजूंचा विचार होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यापकांवर किती ताण पडला याविषयी बोलताना रयतमध्येच काम करणारे एक प्राध्यापक सांगत होते : "मतदारांच्या याद्या बनवण्यापासून मतदानकक्ष सांभाळण्यापर्यंत सगळी कामं शासन आमच्याकडून करून घेते. अशा अशैक्षणिक कामांचा आमच्यावर किती बोजा पडतो याची सर्वसामान्य नागरिकांना कल्पनाही नसते. कालचीच गोष्ट घ्या, निवडणुकीचं इतकं काम होतं, की मला घरी पोचायला रात्रीचे तीन वाजले होते.” यावेळी त्यांना अनुमोदन देत समोरच बसलेले रयतमधल्याच एका महाविद्यालयाचे प्राचार्य सांगू लागले, "निवडणुकांच्या जोडीला सध्या परीक्षांचेही काम आहे. अजुनी चालतोची वाट... ३५४