पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुठल्याही शिक्षणप्रक्रियेत शिक्षक हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असणार हे अगदी उघड आहे. त्या आघाडीवरची रावसाहेबांची निरीक्षणेही त्यांनी निर्भीडपणे मांडली आहेत. ते लिहितात : " संस्थेचा मुख्य आशय म्हणजे शिक्षण शिक्षक आणि प्राध्यापक यांच्यावरच प्रामुख्याने शिक्षणाची मदार ! भाऊरावांच्या काळात ध्येयाने प्रेरित होऊन समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक संस्थेला लाभले. शिक्षकाने खावे-प्यावे - जगावे आणि शिक्षणाचे काम करावे ही गांधीजींची उक्ती प्रत्यक्षात आणण्यात भाऊराव पाटील यशस्वी ठरले. आजचे संस्थेमधील शिक्षक प्राध्यापक मात्र या विचारापासून बाजूला जात असल्याचे दिसते. कमी काम आणि जादा दाम यासाठी लढाऊ वृत्तीने शिक्षक प्राध्यापकांच्या संघटना पुढे ठाकतात. ऐन परीक्षाकालात संप करून विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सेवक स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी व कर्तव्यनिष्ठा जागरूक ठेवीनासे झाले म्हणजे कर्तव्यच्युती होते. मग कायद्याचा आधार घेऊन कारवाई करावी लागते. या संबंधात शिक्षकांच्या सेवाशर्ती व विद्यापीठाचे कायदे हे प्रमुख कायदे आहेत. कर्तव्यच्युती झाल्यास या कायद्यांच्यामध्ये जी उपाययोजना सुचविली आहे ती पाहता हसावे की रडावे हे कळत नाही. बुद्धी आणि विचार सुन्न होतात. कर्तव्यच्युती करणाऱ्या व्यक्ती मग अशा कृत्यात निर्ढावतात. त्यांना कशाचाच धाक वाटेनासा होतो. कर्तव्यच्युतीविरुद्ध उपाययोजना करणाऱ्यांच्या नशिबी फक्त हात हलविणे येते. शिक्षक, प्राध्यापक यांच्या कामासंबंधी accountabilityची निश्चित स्वरूपाची प्रभावी योजना नाही. अमेरिकेतील प्रख्यात प्रिन्स्टन विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या परीक्षणावरून एका प्राध्यापकाला कमी करण्यात आले. तो प्राध्यापकदेखील साधा नव्हता, तर नोबेल प्राईझ विजेता होता! पण तो त्याच्या संशोधनकार्यातच मग्न! विद्यार्थ्यांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष ! आपल्याकडे असे काही स्वप्नात तरी घडू शकेल का ?" (शिक्षण आणि समाज, ५०-१-२-३) लोकसत्ता दैनिकाच्या पुणे आवृत्तीत ६ जानेवारी २०१४ रोजी शिक्षक महाबळेश्वरला, शाळा 'थंडा'वल्या या मथळ्याखाली एक ठळक आणि विस्तृत बातमी प्रसिद्ध झाली होती. मुंबईहून 'खास प्रतिनिधी'ने दिलेल्या या बातमीत म्हटले होते :

"महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद' या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेच्या नऊ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनानिमित्त राज्यभरातील बहुतांश कर्मवीरांच्या वाटेने... ३५३