पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकोपा टिकून आहे. धोरणे ठरवण्यात, त्यांच्या अंमलबजावणीसाठी निधी उभारण्यात, शासकीय पातळीवरचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. ते आमचे प्रेरणास्थान आहेत, आमचे शक्तिस्थान आहेत." रयतमुळे रावसाहेबांशी ज्यांचा निकटचा संपर्क येत राहिला असे आणखी एक राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे भारती विद्यापीठाचे संस्थापक व महाराष्ट्राचे सध्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम. त्यांच्याविषयी रावसाहेब लिहितात : " सुमारे तीस-बत्तीस वर्षांपूर्वी पतंगरावांची व माझी जी ओळख झाली ती मुख्यतः रयत शिक्षण संस्थेच्या कामाच्या निमित्ताने मी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचा सदस्य या नात्याने साता-याला बैठकीसाठी येत असे. पतंगरावांना रयतच्या कार्यामध्ये चांगलाच रस होता. कर्मवीर भाऊराव पाटलांना ते श्रद्धास्थानी मानतात. खरेतर पतंगराव हे स्वतः रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी. संस्थेच्या सातारा येथील शिवाजी महाविद्यालयात त्यांनी 'कमवा आणि शिका' उपक्रमात सहभागी होऊन शिक्षण पूर्ण केले. इतकेच नाही तर पुढे हडपसर येथील रयतच्याच साधना विद्यालयात शिक्षक म्हणून कामदेखील केले. त्यावेळी त्यांना साठ रुपये महिना वेतन मिळायचे. हायस्कूलच्या टेबलावर झोपूनही त्यांनी दिवस काढले. सतत पुढे जाण्याची जिद्द, चिकाटी, परिश्रम व ध्येयावरील अढळ निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी यशाच्या शिखराकडे वाटचाल केली. गेल्या सुमारे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत. संस्थेच्या कामकाजात त्यांचा प्रभावी सहभाग आहे, तसेच संस्थेत त्यांचा दबदबाही आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शिरवळ येथील महाविद्यालयाची गाडी रुळावर येत नव्हती. अनंत अडचणी होत्या. प्रामुख्याने महाविद्यालयाच्या आर्थिक बाबीचा बराच खल होत असे. पण मार्ग निघणे सोपे नव्हते. पतंगराव कर्तव्यभावनेने पुढे झाले. त्या कॉलेजची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. नुसती तोंडदेखली नव्हे; थोड्याच काळात त्यांनी कॉलेजचा चेहरामोहरा पार बदलून टाकला. त्यांनी वेळीवेळी दिलेल्या देणग्यांच्या रकमा कोटींच्याच घरात जातात. पतंगराव कोठेही त्याची जाहिरातबाजी करत नाहीत." या संदर्भात रयतचेच एक माजी विद्यार्थी, माजी खासदार पनवेलचे रामशेट ठाकूर यांचाही उल्लेख करायला हवा. त्यांनीही वर्षानुवर्षे रयतसाठी देणग्या दिल्या आहेत व तीही रक्कम कित्येक कोटी होईल. रावसाहेबांच्या या नेत्यांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे उपरोक्त वर्णन वाचताना सर्वसामान्य वाचकाच्या मनात एक प्रश्न उद्भवणे साहजिक आहे. तो म्हणजे रावसाहेबांसारख्या नैतिक मूल्यांना व आचरणाला नेहमीच खूप महत्त्व कर्मवीरांच्या वाटेने ... ३४७