पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही. संस्थेचे त्यावेळचे अनेक आजीव सदस्य अशाच समर्पित भावनेने वर्षानुवर्षे काम करत आले होते. याचे मुख्य कारण म्हणजे स्वतः कर्मवीरांनीच आपल्या दैनंदिन जगण्यातून तसा आदर्श इतरांपुढे निर्माण केला होता. त्यांनी ना कधी स्वतः पैसे कमावले ना आपल्या कुठल्या कुटुंबीयांना कमवू दिले. यथा राजा तथा प्रजा हे संस्थेच्या बाबतीतही अगदी खरे आहे. स्वतः संस्थाचालक जेव्हा समर्पित, प्रामाणिक जीवन जगत असतात तेव्हा इतरांनाही तसेच वागण्याची प्रेरणा मिळत राहते; किंबहुना तसे वागण्याची एक संस्कृतीच संस्थेमध्ये तयार होते. हीच समर्पणाची जोपासना रयतमध्ये होत राहिली. त्यागाची ही श्रेष्ठ परंपरा रावसाहेबांनी आजही चालू ठेवली आहे. ठाणगाव या आपल्या मूळ गावी असलेल्या डॉ. अण्णासाहेब शिंदे ज्युनियर कॉलेजसाठी आपल्या अमृतमहोत्सवानिमित्त एक्कावन हजार रुपयांची देणगी जून २००१ मध्ये रावसाहेबांनी दिली होती त्याचाही इथे उल्लेख करायला हवा. काळाच्या ओघात ९ मे २००८ रोजी रावसाहेब रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन बनले. त्याच्या थोडेच दिवस आधी त्यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाली होती. महात्मा गांधी यांचे व्याही आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची या संदर्भात आठवण होते. त्यांनी देखील अशीच उतारवयात एक मोठी जबाबदारी स्वीकारली होती - वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी, १९५९ साली, त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. आणि त्यानंतर लगेच १९६२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाचे सणसणीत १८ खासदार निवडून आणून दाखवले होते. - महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि रयत शिक्षण संस्था यांच्यातील जवळीक तशी नवीन नाही. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या क्रमांकाचे स्थान निर्विवादपणे यशवंतराव चव्हाण यांचे होते आणि तेच १९६० ते १९८४ अशा प्रदीर्घ काळासाठी रयतचे अध्यक्ष होते. "रयत शिक्षण संस्था ही समाज परिवर्तनाची एक प्रयोगशाळा व्हावी, " हा विचार त्यांनी आवर्जून मांडला होता. तसेच "रयत शिक्षण संस्थेने शहरामध्ये शाळा, महाविद्यालये काढण्याचे मला फारसे कौतुक वाटत नाही. कर्मवीर अण्णांचा विचार वंचितांच्या भागात शिक्षण प्रसाराचा होता. तेव्हा आता आदिवासी भागात शिक्षण प्रसाराचे काम संस्थेने केले तर मला ते अधिक कौतुकास्पद वाटेल,” असेही त्यांनी एका कर्मवीरांच्या वाटेने... ३४५