पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बैलांना मात्र चारा घालावा लागे. एवढे झाले, की मग त्या दिवशीचे घरकाम संपायचे. मग उमाआत्या त्यांना गरमागरम बाजरीचा काला तेलगुळासह पोटभर खायला द्यायची. देवठाणची बाजरी अतिशय चवदार असे. त्यानंतर पेलाभर दूध. आणि मग शाळा. देवठाणमध्ये शाळेजवळच एक मारुतीचे मंदिरही होते व त्या मंदिराला रावसाहेबांच्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिरात डॉक्टर भुतेकर म्हणून ओळखले जाणारे एक गृहस्थ राहत. मारुतिमंदिराची आणि व्यायामाची सांगड घालणारी एक परंपरा समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात निर्माण केली व भुतेकर हे तिचे पाईक होते. वय प्रौढ असले, तरी त्यांचे शरीर अगदी बलदंड आणि पिळदार होते. ते फक्त लंगोट नेसत व कधीकधी वरून भगवी कफनी. काळ्यापांढऱ्या केसांची भरघोस दाढी छातीवर लोळायची. खांद्यावर एखादे उपरणे असे. डोक्याला टक्कल. गव्हाळ वर्ण, तेजस्वी कांती. रोज पहाटे ते दंडबैठका घालताना 'हूंऽ हूंऽ' असा एक विशिष्ट आवाज काढत व तो देऊळभर घुमत असे. ते कोण, कुठले याचा गावात कोणालाही थांगपत्ता नव्हता पण अख्ख्या गावाला त्यांच्याविषयी आदर वाटायचा. कोणाच्याही घरी ते कधीच पाय ठेवत नसत, भिक्षा वगैरेही कधी मागत नसत. गावकरीच त्यांना दूध- जेवण वगैरे आणून देत. तशा एरवीही त्यांच्या गरजा अशा फारशा नव्हत्याच. ते सतत लोकजागृतीच्या कामात मग्न असत, सभा-बैठकांमधून प्रबोधनपर भाषणे करत. देवठाणला त्यांनी एक मोठी लोकपरिषदही आयोजित केली होती. म्हणत. रावसाहेबांना ते खूप आवडू लागले; त्यांची देवळातली ये-जा वाढली. स्वातंत्र्यलढ्याविषयी, गांधी-नेहरूंसारख्या राष्ट्रीय नेत्यांविषयी ते माहिती देत. त्यांचा आवाज दमदार होता. आपल्या खड्या आवाजात ते क्रांति त्यांना हिंदी गाणीही येत. 'झंडा उंचा रहे हमारा' सारखी देशभक्तिपर गाणी ते म्हणत. रस्त्याने चालतानाही मोठ्याने असली गाणी गात. कधीकधी ते रावसाहेबांना जवळच्या डोंगरावर घेऊन जात. तिथेही वेगवेगळ्या प्रबोधनपर गोष्टी सांगत. त्यांच्याविषयी व्यक्तिगत माहिती गावात कोणालाच नव्हती. सगळे त्यांना डॉक्टर भुतेकर म्हणत, पण तेच त्यांचे खरे नाव होते अशी खात्री कोणीही देऊ शकले नसते. मात्र त्यांच्या तेजस्वी वागण्यामुळे व प्रखर देशभक्तीमुळे गावकरी त्यांना खूप मानत. रावसाहेबांनातर त्यांच्यापासून खूप काही शिकता आले. एक दिवस अचानक कोणालाही न सांगता ते गावातून गायब झाले. कुठे गेले याचा कोणालाच काही पत्ता लागला नाही. बऱ्याच वर्षांनंतर एकदा नाशिकला अजुनी चालतोची वाट... ३४