पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागला. या कामामध्ये प्राचार्य अनारसे व प्राचार्य शिवाजीराव भोर यांची मोलाची मदत झाली. प्राचार्य अनारसे हे या महाविद्यालयाचे १९८५ ते १९९७ अशा बारा-तेरा वर्षांच्या प्रदीर्घ काळातील प्राचार्य होते. त्यांच्या काळातच या महाविद्यालयाच्या इमारती उभ्या राहिल्या. प्राचार्य अनारसे यांनी ह्या महाविद्यालयाची गुणवत्तेच्या बाबतीत उंची वाढवली. पुणे विद्यापीठात या महाविद्यालयाचे स्थान पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असण्याचे मोठे श्रेय प्राचार्य अनारसे यांना आहे. सर्व तऱ्हेच्या इमारतींनी सुसज्ज असा इतका देखणा परिसर क्वचितच एखाद्या बी.एड. महाविद्यालयाचा असू शकतो. या संबंधात एक शल्य मात्र रावसाहेबांच्या मनात आहे. या महाविद्यालयासाठी ग्रंथालयाच्या इमारतीवर सुमारे तीनशे-साडेतीनशे प्रेक्षक बसू शकतील असा एक भव्य हॉल त्यांनी जाणीवपूर्वक बांधून घेतला होता. त्यामागे हेतू असा, की या महाविद्यालयात 'शिक्षण' या विषयासंबंधी विद्यापीठाच्या पातळीवर, राज्य पातळीवर आणि आंतरविद्यापीठ व देशाच्या पातळीवर, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त व अर्थपूर्ण चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदा, व्याख्याने आणि भाषणे आयोजित केली जावीत आणि शिक्षणातून मानवी जीवनाला दिशा देणारे महाविद्यालय अशी याची ख्याती व्हावी. प्राचार्य अनारसे यांच्या काळात या दिशेने काही पावले उचलली गेली. ‘चारित्र्यहीन शिक्षण, एक सामाजिक पाप' या रावसाहेबांनी सादर केलेल्या प्रबंधावर या महाविद्यालयात प्राचार्य अनारसे यांनी चर्चासत्रही घेतले. तथापि काळाच्या ओघात पुढे या कामात अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही. - रावसाहेबांनी सुरू केलेला आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 'दिशादर्शक प्रकल्प.' पदव्या घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची फौज आज देशाच्या सगळ्याच भागांमध्ये दुर्दैवाने पदवीचा कागद आज तुम्हांला रोजगार मिळवून देण्यासाठी अपुरा आहे. त्यामुळे पदवी हाती पडल्यावर पुढे काय करायचे याचा विचार विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच करणे व त्या दिशेने जाण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये अंगी बाणवून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. हेच दिशादर्शक प्रकल्पामागचे उद्दिष्ट आहे. २८ ऑक्टोबर २००१ रोजी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ झाला. या प्रकल्पांतर्गत वेळोवेळी वेगवेगळ्या व्यवसायक्षेत्रांमधील तज्ज्ञ विद्यार्थ्यांपुढे व्याख्याने देतात व त्यांना मार्गदर्शन करतात. संस्था चालवताना सगळ्याच गोष्टी काही सामोपचाराने किंवा गोड गोड बोलून साध्य होत नाहीत; अनेकदा संघर्षही करावा लागतो, कठोर पावलेही अजुनी चालतोची वाट... ३३६