पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करावी व त्यासाठी रावबहादूर नारायणराव बोरावके यांच्याकडून देणगी मिळवावी असे त्यांच्या मनात होते. पण बोरावके यांच्याकडून सहजासहजी देणगी मिळेल अशी परिस्थिती नव्हती. त्यासाठी अण्णासाहेबांची मध्यस्थी कामी आली. अण्णासाहेबांचे एक निकटचे स्नेही कॉ. लक्ष्मणराव पालवे हे कामगारनेते होते व त्यांच्याच युनियनमध्ये बोरावके फार्ममधील शेतमजूरही होते. यामुळे बोरावके यांच्याबरोबर पालवे यांचा नित्य संपर्क असायचा. त्यांच्याच मार्फत अण्णासाहेब बोरावके यांना भेटले. दोघांमध्ये चर्चा झाली. रेल्वे स्टेशनसमोर बोरावकेंचे एक बरेच मोठे गोडाउन होते; ते रयतने भाड्याने घ्यावे व तिथे महाविद्यालय सुरू करावे अशी बोरावके यांची इच्छा होती. संस्थेने तशी तयारी दर्शवल्यावर मग बोरावके यांनी देणगी द्यायची तयारी दर्शवली. अण्णासाहेब आणि बोरावके यांच्यात झालेल्या या चर्चेच्या वेळी कॉ. पालवे हजर होते. अण्णासाहेबांना ते फार मानत व अण्णासाहेबांचा यात सहभाग आहे म्हटल्यावर त्यांनी तत्परतेने बोरावकेंपाशी हा विषय काढला होता. त्यानुसार बोरावके यांनी दोन लाख रुपयांची देणगी दिली व १९६० साली रावबहादूर नारायणराव बोरावके यांच्या नावाने श्रीरामपूर येथे आर्ट्स व सायन्स कॉलेज सुरू झाले. शंकरराव उनउने यांची महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून निवड झाली. सुरुवातीच्या काळात रावबहादूर बोरावके यांच्या गोडाउनमध्ये कॉलेज भरायचे. गोडाउनचे भाडे देणे जिकिरीचे व्हायचे. भाडे कमी व्हावे म्हणून प्राचार्य उनउने यांनी व रावसाहेबांनी खूप विनवण्या केल्या प त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले नाही. त्यामुळे मग भाड्याच्या जागेत कॉलेज चालवण्यापेक्षा श्रीरामपुरात संस्थेची स्वत:चीच मोठी जागा असावी म्हणून अण्णासाहेब करत असलेल्या प्रयत्नांना अधिक जोर आला. त्या काळात तिथे के. बी. जितकार नावाचे प्रांत अधिकारी होते व त्यांच्या हाताखाली बी. ए. पाटील नावाचे श्रीरामपूर तालुक्याचे होते. दोघांनाही सामाजिक जाणीव होती व त्यांनी याबाबतीत अण्णासाहेबांना मनापासून सहकार्य दिले. बेलापूर रेल्वे लाइनीच्यापलीकडे एक जर्मन मिशनचे हॉस्पिटल सोडले तर त्यावेळी फारशी वस्ती नव्हती. नगरपालिकेच्या हद्दीबाहेर शिरसगाव शिवारात बरीच सरकारी जमीन पडून होती. त्यातील ४३.२८ एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला द्यायचे ठरले. आज त्याच जागेत रयत शैक्षणिक संकुल उभे आहे. इतकी मोठी सलग जमीन एखाद्या शैक्षणिक संस्थेला मिळणे आज दुरापास्तच आहे. बाजारभावाचा विचार केला तर आज या जमिनीची किंमत कित्येक कोटींच्या घरात जाईल. अण्णासाहेबांनी यात खूप मोलाचा पुढाकार घेतला होता; पण आपल्या 'नेकी कर और दरिया में डाल' या अजुनी चालतोची वाट... ३३२