पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमचे आजोबा धोतर व फेटा घालीत, तर आमची आजी व आई नऊवारी साडीतल्या. लग्नाच्या अगोदर काकींच्या व आमच्या परिवारांमध्ये किमान एका पिढीचे अंतर. शहरी व सर्विस क्लास वातावरणात कोल्हापुरात वाढलेल्या शेकदार ह्या लग्नानंतर श्रीरामपूरच्या ग्रामीण शिंदे कुटुंबाचा एक हिस्सा झाल्या. मी उनाड मुलगा असल्यामुळे मला वळण लावण्यासाठी रावसाहेबकाका व काकींच्या देखरेखीखाली एक वर्ष ठेवण्यात आले. त्यामुळे मला शशीकाकींना अगदी जवळून पाहता आले. रावसाहेब काकांच्या तापट स्वभावाला आळा घालीत अप्रतिम सहचारिणी बनलेल्या शशीकाकी, सर्व वयोगटातील व्यक्तींबरोबर तितक्याच सहजतेने वावरणाच्या शशीकाकी यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले व आजही मी त्यांना 'मम्मी' म्हणूनच संबोधतो. पुढे आमचे वडील अण्णासाहेब खासदार म्हणून दिल्लीला गेले व आमच्या आई व आम्ही १९६२ ते १९८० पर्यंत दिल्लीवासी झालो. त्यामुळे १९६२नंतर शिंदे कुटुंबीयांची सामाजिक बाजू सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा शशीकाकींवर पडली. त्यांनी ती अप्रतिम सांभाळली. शशीकाकी ह्या शहरी व ग्रामीण राहणीमानाच्या एक अलौकिक मिश्रण बनल्या. नंतरच्या काळात काकी रावसाहेबका कांबरोबर सर्वच कार्यक्रमांत सहभागी होत. तसे पाहिले तर काका-काकी हे एक आदर्श जोडपे म्हणून महाराष्ट्रात काय, पूर्ण देशात अग्रक्रमावर राहतील." ( देणे भगवंताचे, पृष्ठ ७२) कुटुंबीयांवर चांगले संस्कार करण्यात गृहिणीचा वाटा सर्वाधिक असतो हे खरे असले तरी रावसाहेबांचेही संस्कार खूप मोलाचे होते हे नक्कीच. सुजाता हुंबे या त्यांच्या धाकट्या कन्या. त्यांनी सांगितलेली लहानपणची एक आठवण बोलकी आहे. 'सूर्याला जे देतात ते अर्ध्य की अर्ध्य?' यावरून एकदा बाप-लेकींमध्ये चर्चा झाली. मुलीच्या मते 'अर्ध्य' हे बरोबर, तर वडलांच्या मते मात्र 'अर्ध्य' हे बरोबर होते. दोन-तीन दिवसांनी रावसाहेबांनी इतरत्र चौकशी केली, तेव्हा कन्या सुजाता म्हणत होती त्याप्रमाणे 'अर्घ्य' हेच बरोबर आहे ही गोष्ट त्यांना कळून चुकली. लगेचच रावसाहेबांनी मुलीला सांगितले, "सुजा, तुझं म्हणणं बरोबर होतं बरं का! अर्ध्य चूक, अर्ध्य हेच बरोबर !" किती जन्मदाते आपल्या मुलीसमोर आपली चूक अशी कबूल करतील? पण रावसाहेबांनी मनाचा तो मोठेपणा " दाखवला. त्यांच्या मोठ्या कन्या शुभांगी देवकर यांचीही एक आठवण अशीच हृद्य आहे. ब्रेन ट्यूमरच्या मोठ्या ऑपरेशननंतर त्यांना तोल सांभाळताना खूप त्रास होत होता. तसे सर्वच कुटुंब आजारपणात त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होते, पण शशिकलाताई : हे देणे भगवंताचे