पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहिलेल्या आपल्या समाजात ते तसे दुर्मिळच आहे. यासंदर्भात प्रा. शंकरराव गागरे सांगतात : “शशिकलाताईंनी देश-परदेश भ्रमण केले, सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन केले. त्या परदेशप्रवास करून आल्या, की तेथे काय पाहिले याचे फोटोसहित वर्णन त्या प्राध्यापक व विद्यार्थी यांना करून देत. रावसाहेब आणि ताईंमुळे प्राध्यापकही पुढे अनेक शैक्षणिक सहलींमध्ये सामील झाले. आनंदवन, शेगाव, अड्याळ टेकडी, लातूर, नांदेड, नागपूर, अमरावती, सांगली, सातारा, कोल्हापूर असा जवळजवळ सर्व महाराष्ट्र आमचा त्यामुळे फिरून झाला. या प्रत्येक सहलीदरम्यान ताईंसह सर्व जण जेवणाचे डबे बरोबर घेत. रस्त्यात कोठे चांगली गर्द झाडी व पाण्याची व्यवस्था दिसली, की जेवणासाठी गाड्या थांबत. सतरंज्या अंथरल्या जात, खाता खाता सर्वांच्या गप्पागोष्टी होत. अशावेळी कोणी खेडूत जवळ आला, तर ताई आवर्जून त्यालाही जेवण देत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण झाल्यावर ती जागा स्वच्छ झाल्याची खात्री करून घेऊनच नंतरचा प्रवास सुरू होई. पर्यावरणाची जपणूक करण्यातली त्यांची दक्षता ही खरोखर अभ्यासनीय आहे." हादेखील सामाजिक बांधिलकीचाच एक भाग. शशिकलाताईंच्या डोक्यावरून नेहमीच पदर घेतलेला असतो. "आईच्या डोक्यावरचे केस मीसुद्धा कधी पाहिलेले नाहीत, " असे त्यांच्या ज्येष्ठ कन्या शुभाताई एकदा गमतीने म्हणाल्या होत्या! पण त्याचबरोबर शशिकलाताईंना सर्व अत्याधुनिक गोष्टीही सहजगत्या हाताळता येतात हे विशेष. आपली आजी, आजच्या भाषेत सांगायचे तर, खूप टेक-सॅव्ही आहे, याचे नातवंडांना खूप कौतुक वाटते. एक नातू तुषार हुंबे (सुजाता व काकासाहेब बे यांचा पुत्र) लिहितो : "She is a woman who loves to learn and change with the world. Today, she has a smartphone with Watsapp, a laptop she can use to Skype with her daughters and yes, a Facebook account!” अमेरिकेत शिकणारा हा नातू आजीच्या खास आम्लेटचीही आठवण काढतो. तो लिहितो : "My roommates allow me to cook for them only if I am making omelets!" 3 जुन्या-नव्याची उत्तम सांगड घालणाऱ्या शशिकलाताईंविषयी त्यांचे पुतणे अनिल, स्व. अण्णासाहेब शिंदे यांचे मुंबईस्थित उद्योजक चिरंजीव, लिहितात : "आमच्या घरी आमचे आजोबा-आजी, आमचे आई-वडील, रावसाहेब काका, आमच्या धाकट्या आत्या, आमची चुलत बहीण, आमचा आत्येभाऊ व आमचे एक चुलतमामा, तसेच आम्ही चिल्लीपिल्ली असे अकरा - बारा जणांचे कुटुंब. अजुनी चालतोची वाट... ३१६