पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करवला. डॉ. जाधव यांना याचे खूपच अप्रूप वाटले. विशेषतः त्या श्रमिकांकडे निर्देश करीत "ह्यांच्यामुळे आमचे जीवन संपन्न झाले" असे आपल्या भाषणात रावसाहेब म्हणाले, ते डॉ. जाधव यांना खूपच भावले. पुढे जेव्हा ते कुलगुरुपदावरून निवृत्त झाले त्यावेळी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी 'रावसाहेब शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असावेत' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती व त्याप्रमाणे घडलेही. दैनंदिन जीवनातल्या अशा साध्यासुध्या गोष्टींवरूनच आपली खरी संस्कृती दिसून येते. म्हणूनच अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर (१८६५-१९४६) हे इंग्लंडमधील दि डेली न्यूज या विख्यात दैनिकाचे भूतपूर्व संपादक आणि लघुनिबंध (पर्सनल एसे ) या साहित्यप्रकाराचे जनक म्हणतात, "It is in the small matters of daily conduct that we pass judgement upon ourselves and declare that we are civilized or uncivilized. The great moments of heroism and sacrifice are rare; it is the little habits of commonplace intercourse that make up the great sum of life and sweeten or make bitter the journey.” (“वर्तणुकीतल्या छोट्याछोट्या बाबींवरूनच आपण स्वतःचे मूल्यमापन करत असतो आणि आपण सुसंस्कृत आहोत, की असंस्कृत, हे जाहीर करत असतो. आयुष्यात प्रचंड शौर्य दाखवायचे किंवा प्रचंड त्याग करायचे क्षण तसे खूप दुर्मिळच असतात; दैनंदिन वागण्यातल्या साध्यासुध्या सवयींमधूनच अवघे आयुष्य आकार घेत असते आणि आपला एकूण जीवनप्रवास गोड होणार, की कटू, ठरत असते. ") जातिधर्मनिरपेक्षता आणि श्रमप्रतिष्ठा यांच्याप्रमाणेच या परिवारातले आणखी एक आधुनिक मूल्य म्हणजे स्त्रीस्वातंत्र्य; नव्हे स्त्रीसन्मान. स्त्रीमुक्तीचा कुठलाही नारा न देता, बंडाचा झेंडा न उभारता हा स्त्रीसन्मान महादेव मळ्यात सहजगत्या अवतरला आहे. एकूण ग्रामीण भागातील स्त्रियांवर स्वतःच्या कुटुंबात वावरतानाही जी बंधने असतात, ती पाहिल्यावर तर हे स्त्रीस्वातंत्र्य खूपच कौतुकास्पद वाटते. स्वतःची व स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घेत असतानाच आपण एका व्यापक समाजाचे एक घटक आहेत आणि त्या समाजाचीही आपण काळजी घ्यायला हवी याची जाणीव ठेवणे म्हणजेच सामाजिक बांधिलकी. हेही एक महत्त्वाचे असे आधुनिक मूल्य आहे. परंपरेने व्यक्तिनिष्ठ व फारतर कुटुंबनिष्ठ शशिकलाताई : हे देणे भगवंताचे... ३१५