पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हव्यास कधी धरला नाही. ही वृत्ती आजच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर मला खूप महत्त्वाची वाटते. घरातला कर्ता पुरुष जेव्हा भ्रष्ट मार्गांनी अमर्याद पैसा घरी आणू लागतो, तेव्हा या भ्रष्टाचाराचा सुगावा सर्वप्रथम त्याच्या घरच्यांना लागतो. त्या भ्रष्टाचाराला आळा घालणे किंवा उत्तेजन देणे हे खूप मोठ्या प्रमाणावर घरून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असते. घरच्यांना अधिकाधिक चैनीची चटक लागली, तर भ्रष्टाचाराची प्रेरणा वाढीस लागते; पण घरची मंडळी रीतसर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नावरच समाधानी असली, तर काही प्रमाणात तरी भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो, निदान तो करण्याची प्रेरणा तरी कमी होते. पत्नीच्या या समाधानी वृत्तीमुळेच आपली ऐन बहरात असलेली वकिली बंद करायचा निर्णय रावसाहेब घेऊ शकले. ते म्हणतात, "सौ. शशी बरोबर माझी चर्चा झाली होती. वकिलीचा व्यवसाय सोडल्यास खर्चावर मर्यादा येतील, पहिल्यासारखा सढळ हाताने आपण खर्च करू शकणार नाही, स्वतःच्या गाडीऐवजी एस. टी. आणि रेल्वेनेही प्रवास करावा लागेल, प्रत्येक वेळी पाहिजे ती गोष्ट खरेदी करू शकणार नाही इत्यादी बाबी तर शशीने मुलांनाही समजावून सांगितल्या. त्यामुळे मला हा निर्णय घेणे खूपच सुलभ झाले. ' }} व शिंदे पती-पत्नींनी जपलेली इतर काही मूल्ये ही परंपरेपेक्षा नवतेशी अधिक जोडलेली आहेत. उदाहरणार्थ, त्यांची जातिधर्मनिरपेक्षता. श्रीरामपूरमध्ये हॉस्पिटल चालवणाच्या पूर्वीच्या जर्मन मिशन-यांशी व नंतरच्या स्पॅनिश मिशनन्यांशी संपूर्ण शिंदे परिवाराचे निकटचे नाते आहे आणि तसाच घरोबा त्यांचा तेथील शीख समुदायाशीही आहे. हा मराठा, हा ब्राह्मण, हा दलित, हा वाणी अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात कधीही येत नाही. माझ्या त्यांच्याशी आलेल्या संबंधात जातीय भावनांचे प्रतिबिंब कधीही पडल्याचे मला आठवत नाही. या परिवारात देवदेवतांचे वा धार्मिक रीतीरिवाजांचे प्रस्थ जराही नाही, पण विशाल माणुसकी धर्माचे पालन मात्र पदोपदी आहे. श्रमसंस्कार हे या परिवाराने जपलेले असेच एक आधुनिक मूल्य. याबाबतीत महात्मा गांधी व कर्मवीर भाऊराव पाटलांशी यांची नाळ जुळलेली आहे. हे काम मुलांचे, हे मुलींचे असा भेदभावही त्यांनी कधी केला नाही. राजीवसारखा सर्जन मुलगा प्रसंगी म्हशीचे दूधही काढतो, शेतातही काम करतो आणि स्वैपाकघरात एखादा पदार्थ शिजवतोही! "I am very thankful to Mummy कारण, त्यांनी राजीव, सुजा, शुभाक्का यांच्यात मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता सर्वांना सर्व कामांची सवय लावली. याचा सर्वांत जास्त फायदा मला झाला ना !" हे शशिकलाताई : हे देणे भगवंताचे ... ३१३