पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एवढा, की निमंत्रितांची यादी बघताबघता दोन हजारांवर गेली! आता हे फारच खर्चिक प्रकरण बनले. रावसाहेबांचे काही मित्र मग पुढे झाले व खर्चाचा वाटा उचलण्याविषयी बोलू लागले. पण राजीव यांच्या कानावर हे जाताच त्यांनी ठाम भूमिका घेतली. "कोणाकडूनही काहीही पैसे घ्यायचे नाहीत, सगळा खर्च मीच करणार, ," त्यांनी जाहीर केले. आमरसाचा बेतही आधीच ठरला होता. सगळा खर्च थोडाफारतरी आटोक्यात राहावा म्हणून मग कोणीतरी सुचवले, "आपण खास पाहुण्यांकरिता वेगळा शामियाना ठेवू व तिथे फक्त त्यांच्यापुरता आमरस देऊ, बाकीच्यांना वेगळं काहीतरी देऊ.” राजीवनी ही कल्पनादेखील धुडकावून टाकली. "भेदभाव अजिबात नको. कितीही खर्च झाला तरी सगळ्यांना ते आमरसाचंच जेवण द्यायचं, " त्यांनी जाहीर केले आणि शेवटी तसेच झाले. सर्व दोन हजार अतिथी आमरसाचे जेवण करून तृप्त झाले ! हा आतिथ्यभाव मुक्या प्राण्यांनाही जाणवतो की काय कोण जाणे! तसे वाटावे अशीच श्रीरामपूरचे प्रा. शंकरराव गागरे यांची एक आठवण आहे. ते म्हणतात : "महादेव मळा म्हणणे गाई, म्हशी, घोडा, बदके, ससे, कोंबड्या, अनेक पक्षी-पशू यांची वस्ती. या सर्वांची जातीने ताई देखरेख करतात. सर्वांवर मनस्वी प्रेम करतात. एक दिवस आम्ही काही प्राध्यापक व प्राचार्य साहेबांची भेट घेण्यासाठी मळ्यात गेलो होतो. तेथे एक वेगळेच दृश्य पाहावयास मिळाले. सर्व झाडांवर बगळ्यांनी वस्ती केली होती व त्यांच्या विष्ठेने बंगल्याभोवतीची सर्व जमीन घाण झाली होती. ताई म्हणाल्या, 'आम्ही किती भाग्यवान, पक्ष्यांना देखील आमच्याशी मैत्री करावीशी वाटली!' एका अर्थी पशुपक्षी यांनादेखील काही संवेदना असतात; त्यामुळे कोणाच्या किती जवळ जावे हे त्यांना बरोबर कळते, असे लोकमान्य नीदेखील म्हटले आहे. महादेव मळ्यातील झाडावर आसरा घेतला, तर आपण सुरक्षित राहू असे पक्ष्यांनाही वाटावे हेच त्या वास्तूचे भूषण. ' }) शशिकलाताईंनी जपलेल्या पारंपरिक मूल्यांचा विचार करताना त्यांचे कुटुंब प्रेम आणि आतिथ्यशीलता यांच्यानंतर मी आवर्जून उल्लेख करीन तो त्यांच्या समाधानी वृत्तीचा. शशिकलाताई स्वतः समाधानी आहेतच, पण त्यांच्यापासून सर्व कुटुंबात हे मूल्य संक्रमित झाले आहे. या समाधानी वृत्तीमुळेच आपल्या इतर समवयस्क सहकाऱ्यांप्रमाणे परदेशी न जाता राजीव, प्रेरणा यांच्यासारख्या उच्चशिक्षित जोडप्याने श्रीरामपूरसारख्या छोटया गावात रुग्णालय स्थापन करायचा निर्णय घेतला. खुद्द शशिकलताईंनी अधिकाचा अजुनी चालतोची वाट... ३१२