पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याचे सासू-सासऱ्यांना खूप कौतुक वाटायचे. एखाद्या वाचकाला वाटेल, की ग्रामीण भागात सगळीकडेच हे असे असते; पण दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही. आज ग्रामीण भागातही हे संस्कार खूप दुर्मिळ आहेत आणि शिंदे परिवारात ते आहेत याचे मोठे श्रेय शशिकलाताईंना आहे. कुटुंबवत्सलता हा या कुटुंबातील एक मोठाच गुण आहे आणि ही कुटुंबवत्सलता आज आपल्या समाजात खूपच कमी झाली आहे. म्हणूनच महादेव मळ्यात येणारा कोणीही पाहुणा या गुणामुळे प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. अखंड कामात असूनही शशिकलाताईंनी आपल्या मुलांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही; मुलांनीही त्यांना भरपूर यश दिले. सर्वांत मोठी शुभांगी (जन्म : १ जुलै १९५८). लग्नानंतर सौ. शुभांगी बद्रिनाथ देवकर यांचे यजमान बद्रिनाथ कोपरगावचे प्रगतिशील शेतकरी शेतकरी संघटनेच्या कार्याला आयुष्यभरासाठी वाहून घेतलेले. वर्षा, पल्लवी आणि अभिषेक ही त्यांची तीन मुले. नंतरची सुजाता (जन्म : १९ मे १९६२ ) ; लग्नानंतर सौ. सुजाता काकासाहेब हुंबे-देशमुख. काकासाहेब इलेक्ट्रॉनिक आणि कंप्यूटर इंजिनियर म्हणून सिंगापूरमधे नोकरी करतात. तुषार आणि अनिशा ही त्यांची दोन मुले. त्यानंतर राजीव (जन्म : २९ ऑगस्ट १९६३). हा एम. एस. जनरल सर्जन असून त्याच्या पत्नी प्रेरणा या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. या दोघांचे डॉ. शिंदे रुग्णालय महादेव मळ्याला लागूनच आहे. एक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून त्याची ख्याती आहे. रोहित व रश्मी ही त्यांची दोन मुले. सर्वांत धाकटा संजय (२८ डिसेंबर १९६६ ते १८ ऑगस्ट १९८५). हा मात्र इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असतानाच अगदी अचानक देवाघरी गेला; सर्व कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटून. दृष्ट लागावी अशा या सुखी संसाराला, भरल्या गोकुळाला नियतीने लावलेले हे एकमेव गालबोट. परिवर्तनाच्या क्षेत्रात कार्यरत असूनही शिंदे पती-पत्नी कधीही आंबट चेहऱ्याने वावरत नाहीत, किंवा 'चिंता करितो विश्वाची' असाही अविर्भाव आणत नाहीत. रसिकतेने ती जीवनाचा आस्वाद घेतात. दरवर्षी एक-दोन वेळा तरी सहकुटुंब प्रवास ठरलेला. सगळा भारत असा सहकुटुंब पाहून झालेला. कधीकधी तर पंचवीस-तीस जणांचा विस्तारित कुटुंबाचा गोतावळा असतो. आयुष्यभर लक्षात राहतील असेच हे आनंदसोहळे असतात. 'आमच्या युरोप- अमेरिकेच्या दौऱ्यात हिने हजाराच्या आसपास फोटो काढले!" असे रावसाहेब अभिमानाने सांगतात! (1 स्वतःचे मोठे रुग्णालय चालवणारे डॉ. राजीव आईवडलांचा एकही शब्द मोडत नाहीत; सून डॉ. प्रेरणाही नाही. आपल्या सर्जरीच्या कामांतूनही राजीव ट्रेकिंगचा व गिर्यारोहणाचा छंद जोपासतात, शेतीसाठी वेळ काढतात. श्रीरामपुरातच शशिकलाताई : हे देणे भगवंताचे... ३०९